रावेर तालुक्यातील विवरे येथील कपिल पाटील यांची विदेशात गगनभरारी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर तालुक्यातील विवरे येथील कपिल पाटील यांची विदेशात गगनभरारी

रावेर (दिनेश सैमीरे) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथिल रहिवाशी श्रीमती भारती दिलीप पाटील यांचे चिरंजीव कपील दिलीप पाटील यांची इंग्लंड मधील मेडीसीन किंगडम या क्षेत्रात वरिष्ठ अधिकारी पदावर वर्णी लागली आहे ते इंग्लंड मधील ब्रिस्टॉल लॅबोरेटरी लिमिटेड ह्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कंपनीमध्ये वरिष्ठ मेडिसीन असिस्टंट मॅनेजेर विभागासाठी त्यांची नेमणूक झाली आहे. [ads id="ads1"]  

कपील पाटील यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले वडील नसतांना बी.फॉर्मसी चे शिक्षण पूर्ण करुण त्यांनी ब्रिस्टॉल या कंपनीच्या माध्यमातून नोकरी मिळवून ते गेल्या पाच वर्षां पासुन कपील पाटील हे परदेशात नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत मात्र. आपल्या मातीशी नाळ कायम असल्याने त्यांनी मिळवलेल्या यशा बद्दल त्यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे. [ads id="ads2"]  

त्यांचे विवरे येथिल श्री ग. गो. बेंडाळे हायस्कूलचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी व विवरे ग्रामपंचायत उपसरपंच भागवत महाजन, सचिन पाटील, सुरज नरवाडे, सुभाष चौधरी, राहुल पुनतकर, सचिन चौधरी, शरद देशमुख, गणेश इंगळे, युवराज राणे, भूषण पाटील गणेश जुनघरे, जितेंद्र पाटील, अर्चना पाटील, दिपक पाटील, सोनाली भिरुड, कविता सुपे, वर्षा डोंगरे, डॉ पुनम भोगे, वैशाली बखाल भागवत महाजन यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

📣 हेही वाचा:- अवैध गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तीन जणांना २ कोटी १७ लाख रुपयाचा दंड ; कारवाईने परिसरात मोठी खळबळ 

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!