जिल्हयातील शिक्षकांच्या समस्यांसाठी निराकरणासाठी सोमवारी आमदार किशोर दराडेंचा शिक्षक दरबार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थितीत राहणार

            जळगाव ( हमिद तडवी)      जळगाव जिल्हयातील शिक्षकांच्या,शाळांच्या व संस्थाचालकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी सोमवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सह. पतपेढी जळगाव येथे शिक्षक दरबार आयोजीत केलेला आहे. [ads id="ads1"]  

   यावेळी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक मा. बी.बी. चव्हाण साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव, वेतन अधिक्षक प्राथमिक व माध्यमिक तसेच लेखाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.  [ads id="ads2"]  

 जिल्ह्यातील ज्या शिक्षकांच्या शाळांच्या व संस्था चालकांच्या समस्या असतील त्यांनी लेखी अर्जासह शिक्षक दरबाराच्यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार किशोरभाऊ दराडे, शिक्षक नेते संभाजी अप्पा पाटील, आर एच बाविस्कर , यु. यु.पाटील ,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील , जी. आर. चौधरी शिक्षक संघाचे एच.जी.इंगळे ,आर. आर. पाटील , साधना लोखंडे, एस.एन. पाटील, ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष नंदन वळींकर , सुनिल सोनार , शैलेश राणे, सुनिल गरुड , सुनिल पाटील , कलाध्यापक संघाचे एन. ओ. चौधरी, अरुण सपकाळे, शिक्षकेतर संघटनेचे डिगंबर पाटील, संदीप डोलारे , आर.डी. बोरसे, विजय पवार, फेडरेशनचे सेक्रेटरी एस.डी.भिरुड , सी. सी. वाणी यांनी केले आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!