नांदगाव-प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):- नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जातेगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक सजावट करून विद्युत रोशनी करण्यात करण्यात आली होती. गावात सर्वत्र भगवे ध्वज लावून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
पहिले शिवजयंती साजरी करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जातेगाव येथील ग्रामपालिकेसमोर ग्रामपंचायतचे सदस्य संदीप पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंच, उपसरपंच, पंढरीनाथ वरती ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लाठे, संदीप पवार व सुभाष पवार, राजू शेख, सोमनाथ जाधव, मधुकर निवारे, सुरेश जाधव, डॉक्टर प्रकाश चव्हाण, सागर पगारे, रामचंद्र अण्णा, सोमेश्वर शिरडकर, सोसायटी डायरेक्टर पतंग सर यावेळी उपस्थित होते.[ads id="ads2"]
जातेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळपासून स्पीकर लावून शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडे व गीते लावण्यात आले होते. सायंकाळी पाच ते सहा वाजेपासून इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थी प्रगती चव्हाण, प्रणाली चव्हाण, ऐश्वर्या डिके, नचिकेत चव्हाण, ओम सुसर, कुमोद पाटील, अनुष्का पवार, वेदिका सोनवणे, मनोज चव्हाण या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी पोवाडे गाऊन आपले नृत्य सादर केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन करून श्रीफळ फोडून अभिवादन केले.
जातेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय आशा विविध घोषणा देऊन फटाक्यांची आधीच बाजी करत ढोल ताशांच्या व डीजेच्या तालावर तरुणांनी नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला. सदर शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी साठी काकासाहेब चव्हाण, सोमनाथ चव्हाण, विशाल चव्हाण, अभय चव्हाण, विकास चव्हाण, अक्षय पवार अभिमन्यू पवार, जयदेव चव्हाण, अमोल चव्हाण, जयदीप नलावडे आणि तरुणांनी विशेष परिसरात घेतले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल चव्हाण यांनी केले.