रावेर च्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने गरजूंना खासगी दवाखाने किंवा थेट जळगावला जावे लागते. त्यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. तसेच शवविच्छेदनासाठी मनस्ताप होतो.[ads id="ads2"]
त्यामुळे रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) तातडीने कायमस्वरूपी डॉक्टरांची व्यवस्था करावी, रावेर तालुक्यात सन २०११ पूर्वी जे कुटुंब शासकीय जागेत अतिक्रमण करून राहत असतील त्यांची घरे नियमानुकूल करावी अशी मागणीदेखील यावेळी करण्यत आली. दखल न घेतल्यास फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर (Sub Divisional Office Faijpur) मोर्चा काढू असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज
यावेळी संघटनेच्या सचिव नंदा बाविस्कर, जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम, विद्या बाविस्कर, अश्विनी अटकाळे, कविता शिंदे, विजय धनगर, चंद्रकांत सोनवणे, कुंदन तायडे, ललित सोनवणे, मुमताज तडवी, रेखा बेलदार, ज्योत्स्ना सुरवाडे यांच्यासह आदी जण उपस्थित होते.