नांदगाव प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) - नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील काँग्रेस पक्षाचे मनमाड नगरपालिकेचे नगरसेवक मिलिंद उबाळे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.[ads id="ads1"]
यावेळी शिवसेना नांदगाव तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, मनमाड शहर प्रमुख मयूर बोरसे, मनमाड माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, मनमाड महिला आघाडी शहर प्रमुख संगीता बागुल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी विधानसभा संघटक जाफर मिर्झा, माजी नगरसेवक अमिन पटेल, माजी नगरसेवक अमजद पठाण, राकेश ललवाणी, वाल्मीक आंधळे, वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक विकास वाघ, विशाल सुरवसे, सुनील ताठे, अजिंक्य साळी, ललित रसाळ, निलेश व्यवहारे, सचिन दरगुडे, कुणाल विसापूरकर, सनी पगारे, किशोर डोंगरे, निलेश ताठे, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, माजी नगरसेवक संगीताताई गिडगे, सरला गोंधळे, प्रतिभा अहिरे पाटील सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.