दिनांक 2 व 3 एप्रिल रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. सदर साहित्य संमेलनात दोन एप्रिल रोजी संविधान सन्मान रॅली व तीन एप्रिल रोजी धम्म जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर रॅली जळगाव रेल्वे स्टेशन येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहे आणि त्याचे विसर्जन संमेलनाचे स्थळ सरदार वल्लभाई पटेल सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव या ठिकाणी होणार आहे.[ads id="ads1"]
यासंदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती जिल्ह्यामध्ये केली जात आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर साहित्यिक या साहित्य संमेलनासाठी जळगाव येथे दाखल होत आहेत. भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे. संविधान सन्मान रॅली व धम्म जागृती रॅली या दोन्ही रॅलीमध्ये जिल्ह्यातील दहा गावांचा समावेश असणार आहे. या दहा गावांपैकी साळवा हे गाव निश्चित करण्यात आले आहे. [ads id="ads2"]
दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता या संदर्भात राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक भरत शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत साळवा बौद्ध विहारात सभा संपन्न झाली. रमाई पुस्तकाच्या लेखिका वर्षा शिरसाट या प्रसंगी उपस्थित होत्या. प्रा. भरत शिरसाठ यांनी संमेलनाचे एकूण स्वरूप, संविधान सन्मान रॅलीचे स्वरूप आणि धम्म जागृती रॅलीचे स्वरूप विशद केले. त्यामध्ये साळवा गावातील बौद्ध ग्रामस्थांची भूमिका काय, याची सविस्तर माहिती दिली. संविधान सन्मान रॅली तसेच धम्मजागृती रॅली यशस्वी करण्याचे आश्वासन सदर सभेला उपस्थित साळवा येथील बौद्ध ग्रामस्थांनी व्यक्त दिले.
कार्यक्रमाचे आयोजन साळवे येथील जो.शा.बा.युवक मंडळाने सम्राट गौतम बुद्ध बुद्धविहारात केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोमेश नारखेडे हे होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले. कार्यक्रम आयोजनासाठी अध्यक्ष जयेश अहिरे. सचिव विजय अहिरे,शंतनू बाविस्कर, वैभव सपकाळे, कल्पेश माळी, गौरव थोरात, सुमेध अहिरे, तय्यब मिस्तरी,सौ प्रतिभा अहिरे, सौ संगिता अहिरे, सौ सुरेखा अहिरे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभारप्रर्दशन सुधाकर मोरेसर यांनी केले. राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाला गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले. बुध्दवंदना व त्रिशरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.


