जर कुणाला विचारलं तू आळशी आहे का ? तर म्हणेल मी अजिबात आळशी नाही. जर आळसावर बोलायला सांगितलं तर प्रत्येक व्यक्ती सांगेल " आळस हा माणसाचा शत्रू आहे." खूप काही सांगेल पण स्वतः मात्र अंमलबजावणी करणार नाही. आपण आज आळसा बद्दल थोडा विचार करणार आहोत . बरेच लोक आज कामाला टाळाटाळी करतात. यश मिळत नाही म्हणून परेशान होतात. यश जर मिळालं नाही. तर त्याच मानसिकरित्या त्यांचं संतुलन बिघडून जातं. "आळशी व्यक्तींना ना वर्तमान असतो ना भविष्य असते". आळशी लोक हे आळशी नसतात तर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी आळशी नसावं. तर आळशी असण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना त्या गोष्टीबद्दल माहिती आणि ज्ञान नसते . त्यांच्यामध्ये प्रेरणेची कमी असते. यामुळेच लोक आळशी असतात.[ads id="ads1"]
आपण दर वर्षाच्या सुरुवातीला खूप सारे संकल्प करतो. पण जसा जसा एक महिना संपतो तसे तसे आपले संकल्प पण संकल्पच राहतात. असं का होत असेल ? आपण आपल्या कामाची टाळाटाळी करत असतो. कारण ती काम आपणाला आवडत नसते . आपण जी स्वप्न बघत असतो ती स्वप्न पूर्ण न होण्यामागे महत्त्वाचा हात हा आळसाचा असतो .आपल्या स्वप्नाचा शञु हा आळस आहे. कोणत्याही व्यक्तीला असं वाटत नाही की, मी बसून राहावं ! कोणत्याही प्रकारचे काम करू नये. मी दुसऱ्याच्या जीवावर खावं.! मी रात्रंदिवस झोपून राहावं ! मला लोकांनी आळशी म्हणावं असं कुणालाही वाटत नसतं. पण आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या वेळेवर करत नाही, ती नियमाने पन करत नाही. त्यामुळे आळस हा आपलं डोकं वर काढायला लागतो. आपण आळसाच्या कम्फर्ट झोन मध्ये जायला लागतो .आपण कामाची टाळाटाळ करायला लागतो. की हे काम नंतर करू, उद्या करू, या प्रकारची आपण टाळाटाळी करतो. त्या कामाला उशीर होत जातो. जसं की एखाद्या विद्यार्थ्याचं बघता जून जुलै पासून परीक्षेचं सत्र चालू होतं. तर एप्रिल मे पर्यंत अशा रीतीने त्याला अभ्यासाला वेळ हा जून जुलैपासून असतो .पण तो जून जुलैपासून अभ्यास न करता अभ्यासाला हा मार्च किंवा एप्रिलमध्ये जोरात लागतो. पण हाच अभ्यास जर जून पासून केला तर त्याला अभ्यासाचा कंटाळा येणार नाही . त्याचं नियमितता त्याला छान वाटायला लागेल .पण असं होत नाही आपणाला अभ्यासाचा कंटाळा कंटाळा येतो. त्याच्या भाषेत बोर वाटायला लागतं.[ads id="ads2"]
आपण दररोज आपल्या मोबाईलच्या सहवासामध्ये कितीतरी वेळ हा घालवत असतो. आपण आपल्या जीवनात आणि आपल्या मोबाईल सोबत खूप व्यस्त झालेले आहोत. आपण आपल्या मोबाईलवर व्हिडिओ बघतो, व्हिडिओ गेम पाहतो. आपणाला असं वाटतं की माझ्याकडे खूप वेळ आहे .मी नंतर करिअर करणार दोन ते चार वर्षाच्या नंतर या प्रकारचे विचार करणारे आपण एकटेच नाही येत . हे पण लोक त्यांच्या आयुष्यात प्रयत्न करत असतात. पण ते यशस्वी होत नाहीत. आज सोशल मीडियाच्या वापरामुळे आपण खूप सोशल मीडियाचे गुलाम झालेले आहोत. आज मोबाईल आपण हातात घेतो एका कामासाठी आणि कित्येक वेळ घालवल्याच्यानंतर आपणाला आठवण येते की, मी मोबाईल वेगळ्या कामासाठी घेतला होता. मी वेगळे काम करत आहे. तर सोशल मीडिया वापरण्यामुळे आपला वेळेचा खूप मोठा अपव्यय होत आहे. आज सोशल मीडियावर आजचा तरुण हा आपला कितीतरी वेळ घालवत आहे. त्यामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा प्रकारचे खूप सारे अॅपलिकेशन सांगता येतील आपण यशस्वी होत नाही. यामागे सर्वात मोठा रोल हा सध्यातरी मोबाईलचा आहे . आपण एखादे काम करत नाही त्यावर आपण खूप विचार करतो .आपले कामात मन लागत नाही .डोकं कसं काम करतं याची आपणाला माहिती नसते. आपल्या डोक्यामध्ये जे विविध प्रकारची रसायने आहेत. त्याची आपणाला माहिती नसते आपण नेहमी सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये फसत जातो. तर ते का फसतो ? हे सुद्धा आपणाला माहीत नसतं ! सोशल मीडियावर ज्यावेळेस आपला एवढा वेळ जातो तर तो याच्यासाठी जातो की त्यावर आपणाला पाहिजे त्या गोष्टी बघायला , ऐकायला मिळतात. म्हणून आपण दहा मिनिटाच्या ऐवजी 100 मिनिटे ही मीडियावर घालत असतो. सोशल मीडिया वापरल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये डोपामाईन नावाचं रसायन तयार होतं. त्या रसायनाने आपणाला छान वाटायला लागतं . म्हणून आपण सोशल मीडियाच्या आहारी जातो. मग तो आनंद दोन मिनिटांचा का असेना पण आपणाला छान वाटायला लागतं. जो म्हणत असेल मला यशस्वी व्हायचं नाही. पण खरंच त्याला यशस्वी व्हायचं नाही असं नसतं त्याला पण यशस्वी व्हायचं असतं. सर्वांना वाटतं मी खूप यशस्वी व्हावं सर्व वस्तू मला भेटाव्यात पण यामध्ये कधी - कधी त्यांना संधी भेटत नसते. या प्रकारचे लोक हे संधीचा फायदा उचलत नाहीत. स्पर्धेमध्ये चालत असताना जर आपण सतर्क राहलो नाही तर पाठीमागची येऊन आपणाला कुचलून समोर निघून जातील. जर आपणाला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वा च्या समोर आपण राहायला पाहिजे.टाळण्याची जी सवय आपण बनवलेली आहे ती आपण सोडायला पाहिजे .जर एखादं काम आपण करत नसू तर ते काम होणारच नाही असं नाही. दुसरे बरेचसे लोक ते काम करण्यासाठी बसलेले आहेत. म्हणून ते काम हे टाळाटाळ करू नका. तर ते काम यशस्वी रीतीने पूर्ण करा.
वर्षाच्या सुरुवातीला बरेचसे लोक हे अतिशय प्रेरणादायी होऊन व्यायाम शाळेत प्रवेश घेण्याचा निर्धार करतात. काही - काही तर एक वर्ष किंवा सहा महिन्याची फी ही एकदाच देऊन टाकतात. त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी खूप ऊर्जा आलेली असते. त्या कारणाने ते फी भरून टाकतात. पण थोडे दिवस गेल्यानंतर मात्र त्यांची प्रेरणाही कमी व्हायला लागते. प्रेरणेने कमी असलेले लोक हे आज भरपूर आहेत .ज्यांच्यामध्ये हुशारीपणाचं टॅलेंट दंडलेलं आहे पण तरीसुद्धा ते यशस्वी नाहीयेत. खूप काही लोक आहेत ज्यांच्यामध्ये चांगली कौशल्य नसून सुद्धा ते यशस्वी आहेत .जर आपण वर्षाचा विचार केला तर आपणाकडे काय व किती तास असतील? हे आपण बघू एका दिवसात जवळपास प्रत्येकाला माहित आहे की 24 तास आहेत. एका वर्षात 8760 तास असतात. यामध्ये आपण आठ तास दर दिवशी झोपलो तर जवळपास 2920 तास हे आपले झोपण्यात जातात. तरीपण झोपेचे जरी सोडले तरी आपणाकडे 5840 घंटे हे उरतात मग या तासामध्ये आपण जीवन चालण्यासाठी ज्या काही गोष्टी करतो जसे की, आपली वैयक्तिक कामे या गोष्टी केल्या तर त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आल्या तरी पण आपल्याकडे 1920 तास हे कामामध्ये जातात. याला पण आपण जर दूर ढकलले तर आपणाकडे 3920 तास पुन्हा वाचतात. यामध्ये खाणे, पिणे, आंघोळ करणे मोबाईल चालवणे. फेसबुक, व्हाट्सअप स्टेटस , या सगळ्या गोष्टी केल्या तरी 630 घंटे हे आपले त्यामध्ये चालले जातात. तरीपण आपणाकडे 3190 तास हे उरतात . मग या तासांमध्ये आपण काय प्लानिंग करायच्यात ? काय नियोजन करायचं ? हे सर्व यामध्ये आपण करायचं असतं .काही लोक तर या 3190 तास पूर्णच्या पूर्ण व्यर्थ घालवत असतात. यामध्ये जर आपण पुस्तके वाचण्याच्या चांगल्या सवयी लावल्यात तर आपणाला खूप चांगले. निकालाच्या सवयी मिळतात. आपण आता विचार करू की पुस्तकच का वाचायचे ? कारण आतापर्यंत जे लोक यशस्वी झाले आहेत. त्यांनी पुस्तकेच वाचलेली आहेत . जसे की बि.आर. आंबेडकर ,अब्दुल कलाम, सुभाष चंद्र बोस, एम. के .गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी असे खूप लोक आहेत. ज्यांनी पुस्तके वाचून आपले जीवन यशस्वी केले आहे. त्यांचे असे मत आहे की , पुस्तक वाचल्याने आपल्या जीवनातील बऱ्याचश्या समस्या ह्या कमी होतात. म्हणून आपण पुस्तक वाचायला पाहिजेत
जर आपणाकडे 3190 तास असतील तर त्यामध्ये आपण पाचशे पुस्तके हे वाचू शकतो. प्रति वर्षाला यामध्ये आपण एका महिन्याचा जर विचार केला. तर 40 ते 50 पुस्तके हे एका महिन्यामध्ये आपण वाचू शकतो .यामध्ये आपण आपले काम करून सुद्धा एवढी पुस्तक वाचू शकतो. त्यामध्ये आपल्या बिमार्या आल्या , आपली वैयक्तिक कामे आली. तरी पन 40 50 पुस्तके प्रति महिन्याला आपण दहा पुस्तके वाचू हे सहज वाचू शकतो. पण त्यामध्ये पण खूप लोक बहाने बनवतात की, माझ्याकडे वेळच नाही बरेचसे काम सुद्धा असतात. या मोबाईल मुळे तर वाचन पूर्णतः सुटूनच गेलेल आहे. तरीपण आपण प्रति महिन्याला जर पाच पुस्तके वाचले तर जवळपास एका वर्षाला आपण साठ पुस्तके वाचू शकतो. आपण दुसऱ्याच्या चुका पासून शिकायला पाहिजे नेहमी आपल्याकडून चूक घडेल त्यावेळी शिकायला नाही पाहिजे .याच्यामध्ये बराच वेळ हा व्यक्तीचा निघून जातो. जी आजची जीवनशैली आहे. ती खूपच बदललेली आहे. अगोदर लोक 100 किंवा 120 वर्षापर्यंत जगायचे पण आज लोक 60 70 वर आलेली आहेत मग यामध्ये आपण जर वेळेचं नियोजन केलं नाही तर मात्र पूर्ण गणित हे बिघडून जातं. यामध्ये आपण दिवसाची पूर्ण दिनचर्या ही करायला पाहिजे .आपण बालपणापासून बघत आहोत कि आपलं पूर्ण दैनंदिन जीवन हे शाळेपासून ठरलेल असत .सकाळी उठून नाश्ता करणे, शाळेची तयारी करणे , दहा ते पाच शाळेत जाणे, ह्या ह्या वेळेत तीस मिनिटांचा तास शाळेत असतो. पाच नंतर घरी येऊन कपडे बदलणे, अभ्यास करणे, आणि जेवण करून पुन्हा नित्य नियमाने आपला दैनंदिन व्यवहार हा चालू असतो. यात जर बदल केला तर मात्र मग सर्व बिघडत जात. सर्व गणित हे अस्ताव्यस्त होतं. पण आपण जसे जसे मोठे होत जातो तसे तसे आपण यापासून दूर होत जातो. कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही. आपली ऊर्जा आणि प्रेरणा या कमी होत जातात .आपण सक्रिय रीतीने काम करत जात नाही. याच्यामध्ये मोबाईल सारख्या सवयी जर जमल्यात तर मोबाईल सोडणे आपणाला कठीण जाते. आज तर मोबाईल एडिशन सेंटर सुद्धा उघडलेले आहेत. याला बरेच लोक बळी पडत आहे .आज भारतात ज्यावेळेस पासून इंटरनेट ही स्वस्त झालेले आहे .तेव्हापासून लोक मोबाईलचा वापर जास्तीत जास्त करत आहेत असे दिसून येत आहे. आज आपण सुद्धा 50 ते 60 वेळा कमीत कमी दिवसभरातून मोबाईल हा चेक करत असतो. वेगवेगळ्या आपलिकेशन वर जात असतो. आपणाला वाटत असेल की मला मोबाईलची सवय नाही पण नकळतपणे आपणाला मोबाईलची सवय ही लागलेली असते. मोबाईल मुळे आज आपली स्मृती ही कमी होत आहे. हे दिसून येत आहे, मोबाईलचे खूप दुष्परिणाम आहेत. ते आपणाला माहीत असतील .ते आपण वाचलेले असतील ते मी या ठिकाणी सांगणार नाही. जवळपास आपल्या मोबाईल मध्ये 500 ते 600 नंबर हे असतात. त्यापैकी जर आपणाला विचारले की आपले नंबर किती पाठ आहेत. तर आपण एकही नंबर पाठ आहे असं सांगू शकत नाही. कधी कधी तर आपला स्वतःचा नंबर सुद्धा आपणाला पाठ नसतो. त्यामुळे आपली स्मृर्ती ही कमजोरपणा होत आहे . याचं कारण म्हणजे डोपामाईन नावाचं जे रसायन असतं ते आपल्या मेंदूमध्ये मोबाईल घेतल्यानंतर सक्रिय व्हायला लागतं. आपणाला एक मी खूप खुश आहे असा मेसेज ते देत असतं. आपणाला ज्या लाईक कमेंट ह्या येत असतात. त्याच्यामुळे चांगलं वाटायला लागतं. हे सर्व डोपामाईन या रसायनामुळे होत असतं. आपण मोबाईल हा फक्त दोन मिनिटांसाठी घेतो . त्याच्यावर आपले किती मिनिटे जातात हे आपणाला कळतच सुध्दा नाही. मोबाईल सारख्या वस्तूची आपणाला एवढी वाईट सवय का लागते ? तर त्यावर आपणाला आपल्या आवडीच्या गोष्टी ह्या मिळत असतात. जे पाहिजे ते बघायला मिळत असतं. आपण जे बघतो त्याच प्रकारचे घटक ह्या प्रकारचे आपलिकेशन हे आपणाला दाखवत असतात. आता या ठिकाणी एक प्रश्न आहे की मोबाईल ही एक वस्तू आहे. मग तिला आपण चालवतो की ती आपणाला चालवते ?जर आपण योग्य वेळेत योग्य नियोजनानुसार मोबाईल चालवत असू तर तो आपण चालत असतो. पण जर अनियमितपणे आपण मोबाईल चालवत असु तर मोबाईल आपणाला चालवत आहे. यासाठी आपली ऊर्जा आणि प्रेरणा ही खर्च होत जाते. हळूहळू आपण नैराश्याच्या गर्तेमध्ये आपण फसत जात असतो.
आज भारत हा एक युवकाचा देश म्हणून ओळखला जातो .भारतामध्ये आज युवकाची संख्या खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. 20 ते 30 या वयामध्येच जास्तीत जास्त पैसा कमविला जातो .असा आतापर्यंतचा इतिहास आहे पण आज युवकांमध्ये ऊर्जा नावाची गोष्ट नाहीये. त्यांची ऊर्जा आणि प्रेरणा ह्या कमी होत चाललेल्या आहेत. ते स्वतः परेशान आहेत यामध्ये त्यांनी स्वतःला खूप वाईट सवयी लावलेल्या आहेत. बरेच जण मोबाईलला चिपकलेले आहेत. मोबाईलवर तर असे घटक दाखवण्यात येत आहे जेणेकरून आपण खचत आणि खचत जाऊ .तर ह्या गोष्टी पासून जर आपणाला दूर जायचं असेल तर आपण आपल्यामध्ये ऊर्जा आणि प्रेरणा या गोष्टी वाढवायला पाहिजे. आपलं लक्ष हे निर्धारित केलं पाहिजे. तर लक्ष निर्धारित करण्यासाठी काही लोक बोलतील आमच्याकडे वेळ नाहीये. स्त्रिया असतील तर त्या म्हणतात आमचा सर्वच्या सर्व वेळ हा घर कामामध्ये जातो. असे एक ना अनेक अडचणी ह्या आपल्या जीवनात येत असतात. हे आपण चांगल्या रीतीने सांगत असतो. पण हेच जर आपण विचार केला की माझ्याजवळ फक्त सहा महिने आहेत. मी सहा महिन्याच्या नंतर मरणार आहे. तर आपण काय करणार तर यामध्ये आपण स्वतःला जसं पाहिजे तशा प्रकारे जीवन जगणार .हे आपण त्या सहा महिन्यांमध्ये ठरवतो पण आपणाकडे खूप वेळ आहे. म्हणून मी ज्यावेळेस योग्य चांगली परिस्थिती येईल त्यावेळेस मी दिशा ठरवणार मजा ध्येय ठरवणार असं म्हणत असतो. त्यावेळेस आपणाकडून काहीच होत नसते .यावेळेस लोक काय म्हणतील ? आपण असा विचार करत असतो .तर जर आपण प्रत्येक दिवस हा माझा शेवटचा दिवस आहे. अशा रीतीने जर विचार केला तर आपण खूप लवकर यशस्वी होऊ असं म्हणायला काहीही अडचण नाही.
जर आपण एखादं काम करणे सोडून दिले तर त्यामध्ये आपणाला विसरभोळेपणा यायला लागतो. तुमची सवय जर सराव केला नाही तर मोडत जाते. यामध्ये जर आपण ज्ञानाची सवय आजच लावली व त्यात आवड असेल तर मेंदू थकत नाही. म्हणजे आपली आवड हीच जर आपण सवयी मध्ये बदलली तर आपणाला कोणत्याही प्रकारचा कंटाळा कधीही येणार नाही. जसे आपण जर विचार केला की झोपेतून चार वाजता उठणे मला अडचणीचं जातं तर ते अडचणी येतात. पण आपणाला जर उत्साह असेल ऊर्जा असेल एखादं काम करायचं असेल तर त्यावेळेस चार वाजता उठायाने कठीण जात नाही. आपण जर खुश असलो तर आपण सकारात्मक दिसतो आणि आपली काम सकारात्मक होत जातात .डोपामाईन मधून आपणाला खुशी किंवा आनंद मिळत असतो. मग तो आनंद दोन मिनिटांचा का असेना .तो आपणाला आनंद देत असतो. डोपामाईन म्हणून नावाचं जे केमिकल आहे ते केमिकला मध्ये आनंद देण्याची ताकद आहे. मग यामध्ये काही लोक चुकीच्या रीतीने डोपामाईन हे स्वतःच्या डोक्यामध्ये सक्रिय करत असतात. जसे की सिगारेट घेण्यामुळे रूपामध्ये स्तर उंचावतो मग ते दोन मिनिटांचा का असेना कोणत्या मुळे आपणाला आनंद मिळायला लागतो. मग एका सिगारेटच्या दोन मिनिटाच्या आनंदामुळे आपण दोन ते चार चार त्याचे आठ आणि असे पॉकेटच्या पॉकेट ओढायला लागतो. याने आपणाला डोपामाईन चा स्तर वाढवून आपणाला आनंद मिळत असतो. डोपामाईन मग या केमिकल मुळे आपल्या मेंदूला असं वाटायला लागतं की मला कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये. परेशानी असेल तरी आपण ती गोष्ट दूर करत जातो. आपणाला तिची जाणीवच राहत नाही. तर आपण स्वतःला यामध्ये जर सांगितलं की मला ज्या गोष्टीने खुशी वाटते त्या गोष्टीची मी यादी तयार करणार आहे. तर आपणाला कळेल की मला नेमका डोपामाईन किती वेळ लागतो.? आणि कशामुळे म्हणजे जर आपण डोपामाईन चा उपयोग हा जर चुकीच्या रीतीने करत असु तर मात्र कठीण आहे. हेच डोपामाईन चा स्तर चांगल्या गोष्टी करून जर उंचावत असू तर आपल्यासाठी ठीक आहे .पण जर आपण चुकीसाठी करत असू तर आपल्या शरीरासाठी आणि मेंदुसाठी ते घातक आहे. जसे की सिगारेट ओढणे, तासंतास फेसबुक, व्हाट्सअप चालवणे, दारू पिणे, या अशा गोष्टीतून जर आपण डोपामाईन घेत असू तर ते आपणासाठी घातक आहे. पण जर आपण शारीरिक गोष्टी मानसिक गोष्टी आर्थिक गोष्टी यासाठी जर आपणाला डोपामाईन मिळत असेल तर ते आपणासाठी फायद्याचं आहे .डोपामाईन म्हणून वाढवण्यासाठी मी काही गोष्टी आपणाला सांगत आहे जर आपण मेडिटेशन म्हणजेच ध्यान जर आपण केलं तर डोपामाईन मुळे आपला आनंद उंचावतो. दर दिवशी आपण जर एक तास ध्यान केलं तर आपल्या डोपामाईन च स्तर हा 64 टक्क्याने वाढतो विचार करा जर 64 टक्क्याने आपला डोपामाईन यांचा स्तर वाढला तर दिवसभरात आपण कधीही नाराज राहणार नाही. व्यायाम केल्याने सुद्धा डोपामाईन चास्तर हा वाढायला मदत होते .जर आपण दर दिवशी तीस मिनिटांचा व्यायाम केला तर आपणाला डोपामाईन मुळे आनंद वाढायला खूप छान मदत होते. आपण रात्री झोपताना डोपामाईन स्तर तर वाढू नये याची काळजी घ्यायला पाहिजे .तर जर आपल्या शरीरामध्ये वाढला तर आपणाला झोप येत नाही. म्हणजे आपलं शरीर हे सक्रिय होते. याच्यामुळे आपणाला झोप येत नाही. आणि आज खूप लोक आहेत जे सोशल मीडिया रात्री वापरताना झोपतात . तर खूप रात्रीपर्यंत डोपामाईन मुळे झोप येत नाही. डोपामाईन चा स्तर हा आपला वाढलेला असतो. पुढील दिवशी आपलं शरीर थकून जातं आपल्या शरीरामध्ये ऊर्जा राहत नाही. तर यासाठी आपण आपल्या आवडीची कामा. जर केलीत तर आपणाला नेहमी आनंद वाटेल .आणि डोपामाईन चा स्तर तर हा वाढलेला असेल.तर आपण आपल्या जीवनामध्ये एक ध्येय निश्चित करायला पाहिजे .आपण स्वप्न तर नेहमी बघत असतो .पण त्या स्वप्नाच्या दिशेने बरेच लोक हे चालत नसतात. आणि म्हणून त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचत नसतो. आपल्या ध्येयाच्या तलवारीला नेहमी धार पाहिजे जर ती तलवार आपण ठेवून दिले तर तिला तिची धार ही बोथट होत जाईल. आणि त्या तलवारीचे ओझे स्वतःलाच होईल. जर या ठिकाणी आपण विचार केला की तीन तासाचा पिक्चर किंवा सिनेमा हा तयार करण्यासाठी तीन वर्ष जातात. यामध्ये तो डायरेक्टर हा सर्व गोष्टी लिहून काढतो. याच प्रकारे आपण आपल्या जीवनात आपणाला काय करायचं याचा जर आपण खूप चांगला फायदा घेतला आपल्या मानवी मेंदू कडून तर खूप चांगला निकाल आपणाला मिळू शकतो. राईट बंधूच जर आपणापुढे उदाहरण असेल तर लोकांचा राईट बंधू वर अजिबात विश्वास नव्हता. जसे की हवेत उडणारी बस त्याला तयार करायची होती. पण लोकांचा विश्वास त्याच्यावर नव्हता. या कारणाने त्याने आपले स्वतःचे काम कधी बंद केले नाही .लोकाचा जरी त्याच्यावर विश्वास नसेल तरी त्याचा स्वतःचा विश्वास मात्र त्याच्यावर पूर्णपणे होता. म्हणून आपण स्वतःवर जर विश्वास ठेवला तर राइट बंधू सारखे आपण विमान बनवू शकतो. राईट बंधूला सुद्धा त्या काळात लोकांनी वेढ्यात काढले असेल .पण आज मात्र हवेत उडणारी बस ही तयार झालेली आहे. म्हणून स्वतःचा विश्वास करायला पाहिजे आज आपलं शिक्षण हे आपल्या वास्तविक जीवनात उपयोगात येत नाहीये. त्यामुळे आपण जे काही शिकलो आहोत ते विसरत जात आहोत.
आज आपण जे काही काम करत आहोत त्या कामांमध्ये मला मजा यायला पाहिजे तर त्या कामात मजा येत असते .नसता आपण घडीच्या काट्याप्रमाणे चालत असतो. जसे दहा ला जायचं आणि पाचला घरी यायचं तर यामध्ये त्या कामात आपणाला कोणत्याही प्रकारची आवड नसते .आपण फक्त त्या ठिकाणी जातो आणि घरी पाच वाजले की घराकडे येतो. तर यामुळे ते काम सुद्धा नीट होत नाही . आपणाला आवड सुद्धा यायला लागत नाही .तर आपणाला ज्या कामात आवड आहे. ते आपण काम केलं तर त्यात यश मिळतं बरेच लोक हे जीवनात रिस्क नावाची गोष्ट घेत नाहीत .त्यांना काही प्रश्न असतात जर फेल झालो तर लोक काय म्हणतील ? माझ्यामध्ये ती ताकद आहे काय मी यशस्वी होईल का? यासारखे प्रश्न त्यांचं आत्मविश्वास हा खचवत असतात. तर यामध्ये आपण वास्तविक जीवनात खरंच असं काही आहे का हे शोधायला पाहिजे? पण बरेच लोक असं होईल तसं होईल. याच्यामध्ये कोणतेही गोष्टी करत नाहीत. आणि फक्त विचार करत जातात. विचार केल्याने काही होत नाही तर ते विचार अंमलबजावणी केल्याने सर्व काही होतं .बऱ्याच जणांना वाटतं की मी ना योग्य वेळ आल्यानंतर सुरुवात करणार .काही लोक यू.पी.एस.सी.ची परीक्षा तयार करण्याच्या नादात एम.पी.एस.सी.ची परीक्षा तयार करण्याच्या नादात म्हणतात माझी चांगली परिस्थिती आली की मी त्याची तयारी करतो. पण चांगली परिस्थिती कधीच येत नाही .जे कोणती परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये राहूनच आपणाला तयारी करावी लागेल. जर योग्य वेळेची वाट पाहत असणार तर योग्य वेळ ही येणार नाही .म्हणून ज्या परिस्थितीमध्ये आहात त्या परिस्थितीमध्ये आपण सुरुवात करा. आपण यशस्वी होणार नकारात्मक विचार जर आपण केले तर नकारात्मकच परिणाम हे आपणाला मिळतील .जर आपण दोन दिवस उपाशी असलो तर आपण जेवणासाठी वाटेल ते काम करायला तयार असतो. म्हणून आपण नेमके खरंच काय आहोत हे आपण ठरविले पाहिजे. त्यासोबत आपण आपलं ध्येय हे निश्चित केलं पाहिजे.
प्रमोद पडघान (मानसशास्त्रज्ञ)
रा. आडोळी ता. जि. वाशिम
संपर्क ९०७५९७७ २३९


.jpg)
