लाकडांची अवैध तस्करी रोखली; रावेर आरएफओंची धडाकेबाज कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
लाकडांची अवैध तस्करी रोखली; रावेर आरएफओंची धडाकेबाज कारवाई


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : लिंबाच्या लाकडांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर रावेर आरएफओंनी (Raver RFO) धडाकेबाज कारवाई केल्याने लाकुड तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रावेर परिसरातुन बु-हानपुर (मध्य प्रदेश) मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी होत असल्याची ओरड असतांना आज (दिनांक 26 फेब्रुवारी) केलेल्या कारवाईमुळे तस्करी करणाऱ्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"]  

वन विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार दि 26 फेब्रुवारी रोजी पहाटे रसलपुर ते रावेर (Rasalpur To Raver) रस्त्याने विनापरवाना जाळवू वृक्षाचे वाहतूक करणारे ट्रक लक्रमांक एम एच 19 झेड 7862 ट्रक किंमत अंदाजे तीन लाख व बारा हजार जाळावु सरपण असा एकूण तीन लाख 12 हजार किमतीच्या मुद्देमाल सापडा रचून जप्त करण्यात आले.[ads id="ads2"]  

वाहन चालकविरुद्ध गुन्हा दाखल

सदर वाहन चालक शेख कलीम शेख कबीर रा.रावेर यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927 अन्वय प्रथम रिपोर्ट क्रमांक 01/2023 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे पुढील तपास वनपाल रावेर करीत आहे. 


ही सर्व कार्यवाही वनसंरक्षकधुळे (प्रा.) दिगंबर पगार उपवनसंरक्षक यावल .जमीर शेख सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाने वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे वनपाल रावेर रवींद्र सोनवणे, वनपाल पाल अरुणा ढेपले, वाहनचालक विनोद पाटील यांच्या पथकाने केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!