नांदगाव जि.नाशिक प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):- नांदगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सध्या विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर नांदगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवावा असे आवाहन तालुक्यातील पाच माजी आमदार यांनी विद्यमान आमदार सुहास कांदे यांना केले.[ads id="ads1"]
शेतकऱ्यांच्या कापूस व कांद्याला योग्य बाजार भाव मिळावा या मागणीसाठी सोमवारी 27 फेब्रुवारी 2023 रोजी फेब्रुवारी नांदगाव येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारा पुढे मतदार संघातील माजी आमदार पंकज भुजबळ, एडवोकेट जगन्नाथ धात्रक, एडवोकेट अनिलदादा आहेर, राजाभाऊ देशमुख, संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे येवला रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. तर लिलावाच्या कामकाजावर देखील परिणाम झाला. आंदोलनाच्या दरम्यान माजी आमदारांनी सुहास कांदेंवर टिका करण्याची संधी सोडली नाही.[ads id="ads2"]
केंद्र सरकार व राज्यातील सरकार शेतकऱ्यांची कशी हेळसांड करीत असून दररोज कोसळणाऱ्या बाजारभावामुळे नांदगाव तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आम्ही देखील सतर्कटाचे आमदार असताना देखील विधिमंडळात स्वतःच्या सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवित सभागृहाला निर्णय घेण्यास पार पाडण्याची आठवण माजी आमदार एडवोकेट अनिल आहेर यांनी करून दिली. शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना नांदगावहुन दिल्लीला गेल्यावर शेतकऱ्यांच्या निर्यात धोरणावर कसा निर्णय घेतला याची आठवण माजी आमदार पंकज भुजबळ यांनी करून दिली. माजी आमदार संजय पवार यांनी आपल्या माजी आमदारांच्या संघटनेत पुढील वर्षी अजून एक सभासद वाढणार असल्याच्या निष्कर शब्दात खिल्ली उडवली.
नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार कोणकर यांनी मोर्चेकरी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. काँग्रेस तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाध्यक्ष गणेश धात्रक, सतीश बळीद, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय पाटील, विनोद शेलार, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, राजेश सावंत, वाल्मीक टिळेकर, राजू राठोड, दादा पगार, बाळासाहेब देहाडराय, राजाभाऊ आहेर, योगिता पाटील, सीमा राजुळे, अलका आयनोर, मनोज चोपडे, उदय पाटील, उदय पवार, शिवाजी बच्छाव, योगेश कदम, रामदास पाटील, प्रवीण घोटेकर आदी सह घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आभार मानले