रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना संस्था अध्यक्ष ,तसेच माजी राज्यमंत्री माननीय, बच्चुभाऊ" यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच, प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी, यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष माननीय ,बाळासाहेब" पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 27/ 02/ 2023 रोजी पाडला बुद्रुक तालुका रावेर या गावात प्रहार दिव्यांग क्रांती संघटना या शाखेचे उद्घाटन सोहळा प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला.[ads id="ads1"]
गोरगरीब, अनाथ अपंग बांधवांपर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना पोचल्या पाहिजे हे धोरण प्रहार दिव्यांग संस्था अध्यक्ष माननीय बच्चु भाऊ यांच्या लक्षात आल्यावर प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या दारावर आम्ही त्यांच्या हक्काच्या योजना पोहोचवू ,असे यावेळी बच्चू भाऊंनी सांगितले. तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता, दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत झटेल असे सुद्धा यावेळी तालुकाध्यक्ष कार्यकारणी यांनी जाहीर केले. तसेच यावेळी प्रहार दिव्यांग संघटनाचे उपजिल्हाध्यक्ष म्हणून दिनेश सैमिरे यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . त्यांच्यावर रावेर, यावल, मुक्ताईनगर ,आणि बोदवड या चार तालुक्यांची जबाबदारी. सोपविण्यात आली.[ads id="ads2"]
पाडला बुद्रुक येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माननीय" अनिल भाऊ चौधरी प्रहार दिव्यांग उपजिल्हाध्यक्ष शेख शकील दादा प्रहार जनशक्ती पार्टीचे शेतकरी जिल्हाध्यक्ष, माननीय ,सुरेश चिंधू पाटील दादा उपजिल्हाध्यक्ष दीपक पाटील उपजिल्हाध्यक्ष दिनेश सैमिरे.
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व रावेर तालुका अध्यक्ष विनोद कोळी ,प्रहार दिव्यांग उपाध्यक्ष शशिकांत पाटील, उपअध्य्क्ष जितेंद्र कोळी, प्रहार दिव्यांग तालुका सचिव भागवत शेलोळे, प्रहार दिव्यांग तालुका सल्लागार विश्वनाथ भिल्ल, तसेच पाडला बुद्रुक येथील शाखाप्रमुख आणि भरपूर गावकरी त्याप्रसंगी उपस्थित होते.