नांदगाव जि.नाशिक (मुक्ताराम बागुल) तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतून नवा कोरा ट्रॅक्टर चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी गुरुवारी रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास अंदाजे एक लाख 76 हजार रुपये किमतीच्या 22 ते 27 अशा एकूण लहान मोठ्या शेळ्या गटातून चोरी झाल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून या चोऱ्या उघडकीस आणण्यासाठी नांदगाव पोलिसांवर मोठे आव्हान आहे. [ads id="ads1"]
नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील युवा शेतकरी सुदाम शहादु अहिरे यांचा शेतीसह शेळ्या पाळण्याचा व्यवसाय आहे. स्वतःच्या घरातुन हा तिच्या अंतरावर त्यांनी या शेळ्यांसाठी लोखंडी पत्रे व जाळ्या वापरून बंदिस्त गोठा तयार केला आहे. त्या गोठ्यास रोज रात्री ते खूप लावून आपल्या घरी जात असतात. [ads id="ads2"]
या गोष्टीची पूर्ण कल्पना असलेल्या अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सदर गोठ्याचे कुलूप तोडून या शेळ्या पायी चालवत सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतराचा डोंगर पार करून कासारी घाटातील रस्त्यावर नेल्या व त्या अज्ञात वाहनाद्वारे पळवून नेल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील औट पोस्टचे पोलीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. या घटनेचे संबंधित शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून ही तर पाळीव जनावरे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


.jpg)