सावदा ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) खुन करून जवळ जवळ १२ वर्षे फरार असलेल्या गुन्हेगाराला सावदा पोलिसांनी (Savda Police) अटक करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. [ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, सावदा पोलीस स्टेशनचे (Savda Police Station) स.पो.नि. श्री. जालिंदर पळे यांना गुप्त माहीती मिळाली की, सावदा पोलीस स्टेशन (Savda Police Station) भाग ०५ गु.र.नं ५१/२०१० भा.द.वि. क ३०२,३०७,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल गुन्ह्यात जवळ जवळ सुमारे १२ वर्षापासुन फरार असलेला आरोपी नामे प्रकाश भिवसन उर्फ भूषण भोई रा. सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव (Savda Taluka Raver Dist Jalgaon) हा सावदा शहरातील भोईवाडा, परीसरात लपुन बसलेला आहे. अशी माहीती मिळाली होती. [ads id="ads2"]
या माहितीच्या आधारे सावदा पोलिस स्टेशन (Savda Police Station) चे. श्री. जालिंदर पळे यांनी लागलीच पो.उप.नि. विनोद खांडबहाले, सफी / १२८४ पांडुरंग सपकाळे, पो.ना. १६१६ यशवंत टहाकळे, पो.ना. / १५५३ अक्षय हिरोळे, पो.हे.कॉ. / १२३९ उमेश पाटील, पो.ना./ २४८६ मेहबान तडवी, पोना / १८४२ देवेंद्र पाटल, पो. कॉ/२१२५ बबन तडवी, पो.कॉ/२१०० संजय तडवी अशा पोलीस अंमलदाराचे पथक तयार करुन त्याना सावदा शहरात भोईवाडा (Bhoi Wada, Savda) परिसरात रवाना होवुन परीसरात सदर आरोपीचा शोध घेण्यास सांगितले.
📣 हेही वाचा :- रावेर तालुक्यातील विवरे येथील कपिल पाटील यांची विदेशात गगनभरारी
📣 हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून चार वर्षीय बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
📣 हेही वाचा:- अवैध गौणखनिजाचा उपसा केल्याप्रकरणी रावेर तालुक्यातील तीन जणांना २ कोटी १७ लाख रुपयाचा दंड ; कारवाईने परिसरात मोठी खळबळ
यानुसार पथकाने या ठिकाणी छापा मारला. आरोपी प्रकाश भिवसन उर्फ भूषण भोई यास पथकातील पोलीसांचा संशय आल्याने तो लपलेल्या जागुन बाहेर निघुन पळु लागला. त्यावेळी पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले व वर नमुद पथकाचे मदतीने पोलीस स्टेशनला आणुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन पुढील तपास सावदा पोलीस स्टेशन चे (Savda Police Station) सपोनि जालींदर पळे व सहकारी करित आहेत.
हेही वाचा : - रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळविले ; अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल
सावदा शहरातील (Savda City) फिर्यादी सौ. सुनिता प्रकाश भोई (मयत) वय ३५ रा. सावदा ही प्रकाश भिवसन उर्फ भुषण भोई रा. सावदा (Savda) याचेसह टेलिफोन ऑफिस जवळील झोपडपट्टीतील वास्तव्यास होती. दि.०६/०६/२०१० रोजी सावदा शहरात (Savda City) टेलिफोन जवळील झोपडीत फिर्यादी सुनिता भोई ही स्वयंपाक करित असताना यातील आरोपी नामे प्रकाश भिवसन उर्फ भुषण भोई रा. सावदा (Savda) हा दारु पिऊन आला. तेव्हा फिर्यादी त्यास बोलली की तुम्ही नेहमी दारु पितात, घरचे वस्तु विकतात तुम्ही घराचे पत्रे सुध्दा विकले याचा आरोपीस राग आल्याने प्रकाश भोई याने फिर्यादीस चापटा बुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी सुनिता हिचे अंगावर रॉकेल टाकुन तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिले. यामुळे तिला गंभीर दुखापत होवु ती मरण पावल्याने सावदा पोलीस स्टेशन भाग ०५ गु.र.नं ५१/२०२२ भा.द.वि क ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घडल्यापासुन आजपावेतो सदर आरोपी हा फरार झाला होता. त्यास पकडण्यास १२ वर्षांनी Savda पोलीसांना यश आले आहे.


