नाशिक रोड येथून धान्य वितरण कार्यालय स्थलांतरित करू नये- भाजपा रिपाईची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


नाशिक (मुक्ताराम बागुल) नाशिक रोड येथून धान्य वितरण कार्यालय स्थलांतरित करण्यात येऊ नये यासाठी दिनांक एक फेब्रुवारी 2023 रोजी बुधवारी भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे गट यांच्या संयुक्त विजामानाने महसूल उपायुक्त श्री संजय काटकर साहेब यांना उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र अनिलभाई गांगुर्डे, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाची भगूर देवळाली मंडल अध्यक्ष विशाल भाऊ साळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.[ads id="ads1"]  

            सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक रोड येथील धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या नाशिक शहरी भागात एकूण 230 स्वस्त धान्य दुकान काढत असून सदर कार्यालयाच्या क्षेत्रात नाशिक रोड, देवळाली कॅम्प, भगूर रोड, उपनगर, गांधीनगर, आगर टाकळी, सुभाष रोड, देवळाली गाव, शिंगवे बाहुला, गुलाब वाडी, चेंढी शिव, सामना गाव रोड, विहितगांव, मळे परिसर, सिन्नर फाटा, गोरेवाडी आधी सर्व भागाचा समावेश आहे.[ads id="ads2"]  

      तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार नाशिक रोड भागातील दसक पंचक, शिंदे पळशी, एकलहरे आदि भागातील एकूण 60 रास्त भाव दुकाने धान्य वितरण अधिकारी कार्यालयात जोडण्यात येणार आहे. यापूर्वी धान्य वितरण अधिकारी कार्यालय हे माननीय जिल्हाधिकारी नाशिक कार्यालयाच्या आवारात होते. परंतु जिल्हाधिकार्यालयात जागा नसल्याने सदर कार्यालय नियमित दर दोन ते तीन वर्षांने स्थलांतरित करावी लागत असल्याने खासदार यांनी नाशिक रोड येथील सरकारची असलेली प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली. असे असताना देखील सदरचे कार्यालय हे नाशिक येथे स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. असे होऊ नये म्हणून दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी बुधवारी महसूल उपायुक्त साहेब यांची भेट घेतली. महसूल उपयुक्त साहेब यांनी निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात येईल अशी आश्वासन दिले.

      याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश नेते तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, भाजप भगूर देवळाली अनुसूचित जाती मोर्चाचे मंडळ अध्यक्ष विशाल भाऊ साळवे, रिपाईचे नाशिक रोड उपाध्यक्ष शरद गायकवाड, रिपाई जिल्हा सचिव सागर अण्णा शिरसाठ, रिपाई नेते मिलिंदभाई निकम, डी एस आंबीलकर, सामाजिक कार्यकर्त्या आरतीताई जाधव, भाजपा युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!