यावल पंचायत समितीला लागले उपोषणाचे ग्रहण
यावल प्रतिनीधी (फिरोज तडवी)
कोरपावली ग्राम पंचायत अंतर्गत 15 वित्त आयोगाच्या माध्यमातुन गावात विविध प्रकारचे विकास कामे झाली असून त्या संपुर्ण कामाची चौकशी होई पर्यंत संबंधीत ठेकेदा राचे बिल अदा करु नये अशी मागणी गटविकास अधिकारी यावल यांना दिलेल्या निवेदन म्हटलें आहे. [ads id="ads1"]
संबंधीत गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदन म्हटलें आहे की, ७/११/२०२२ रोजी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कडे चौकशी अर्ज दखल करून सुद्धा संबंधीत साहाय्यक गटविकास अधिकारी यांनी तक्रारदार यांना कुठलीही माहिती देण्यास का टाळाटाळ करीत आहे. [ads id="ads2"]
शासनाकडून गावाचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेतून ग्रामपंचायतीlला लाखों रुपयांचा निधी मिळत असतो, याच निधिचा वापर योग्य रित्या होत नसल्याचे सामोर दिसून येते,
विकास आराखड्याच्या नुसार पेव्हिग ब्लॉक व नविन गटार , धांपे ही कामे तडवी वाड्यात करण्याचे नमूद करण्यात आले आहे, परंतू तडवी वाड्यातील काही कामे ठेके दाराने आपल्याला मर्जिने का कुणाच्या संगण्यवरून तडवी वाड्यातील पेव्हिंग ब्लॉक चे काम दुसऱ्या वार्ड मध्ये कसे व का केलें असां प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संपुर्ण नविन गटार व ढापे करण्याचे नमूद केले असता ही कामे सुद्धा रीपेरींग के लेली आहेत, उपसरपंच यांनी स्वार्थापोटी आपल्याच नातलगला कामा चे टेंडर दिले असुन त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित होण्यासाठी एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डांत केल्यचे वस्तुस्थिती दिसून येते
दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा संबंधीत ठेकेदार व कवलेटी कंट्रोल, संबंधीत इंजिनियर तसेच सहयक गटविकास अधिकारी यांनी चौकशी करण्यास दिरंगाई केली असल्याचे दिसून निदर्शनास येत असून तरी संबंधीत कामाची सखोल चौकशी न केल्यास मी यावल पंचायत समिती आवारात लोकशाही पद्धतीने दिनांक १३/०२/२०२३ रोजी आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा नबाब महेबुब तडवी यांनी दिला आहे.


