रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी) दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या पालघर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, सदर मेळावा पालघर जिल्ह्यामधील दिव्यांगांच्या समस्या आणि केलेल्या कामाचा आढावा प्रहार चे दिव्यांग ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या दिव्यांगांचा सत्कार समारंभ याकरिता घेण्यात आलेला होता.[ads id="ads2"]
सदर मेळाव्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष सुनील गुप्ता, किशोर पाटील जिल्हा उपाध्यक्ष , विलास भोणे , जिल्हा सचिव तसेच तालुका अध्यक्ष.श्याम गायकवाड , कैलास तांडेल, सोहन राठोड, सुषमा कासारी, सचिन तांडेल, विलास दोडा, श्रीनिवास निकम मीरा-भाईंदर शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष आणि सुदाम अहिरे मीरा-भाईंदर शहर अध्यक्ष आणि पालघर जिल्ह्यातील सर्व प्रहार चे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.