काय आहे संपूर्ण प्रकरण?
गणेश सोळुंखे हा कोळन्हावी या ठिकाणी आई-वडील यांच्यासोबत वास्तव्याला होता. ट्रॅक्टर चालक म्हणून काम करायचा. सोमवारी दुपारी घरात कुणाला काहीही एक न सांगता गणेश हा थेट गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर पोहचला आणि त्या ठिकाणी त्याने पुलावरून तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. हि गोष्ट त्या ठिकाणी गुरे चारणाऱ्यां गुरांख्यांच्या लक्षात आली. यानंतर त्याने तातडीने गावकऱ्यांना ही घटना सांगितली. यानंतर ग्रामस्थ व गुराखी यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तरुणांच्या मदतीने मृतदेह तापी नदीतून बाहेर काढण्यात आला. (Jalgaon Crime News) [ads id="ads2"]
यानंतर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता असता वैद्यकीय अधिकारी डॉ. विसपुते यांनी त्याला मृत घोषित केले. मृत गणेश यांच्या पश्चात आई विठाबाई, वडील संजय पांडूरंग सोळुंखे आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल श्यामकांत बोरसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



