सावदा ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) एस. टी. बसमधील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या हातातील तीन हजार रुपयाचा ऐवज असलेली पर्स एका भामट्याने लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिस स्टेशन ला एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक सुद्धा सावदा पोलिसांकडून करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक
पांडुरंग नारायण पाटील (48, कोचूर तालुका रावेर जिल्हा जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 13 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी नम्रता पांडुरंग पाटील ही रावेर- कल्याण बसमध्ये (Raver-Kalyan-Bus) चढत असताना संशयित निंबाजी गोकुळ पाटील (24, पातोंडी, ता.जळगाव) याने तरुणीच्या हातातील पर्स हिसकावली व त्यास विरोध केल्याने आरोपीने तरुणीला मारहाण सुद्धा करीत घटना स्थळ वरून काढता पाय काढला आणि ते तेथून फरार झाले.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज
या पर्समध्ये तीन हजारांची रोकड, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, एटीएम असा ऐवज होता. सोमवारी या प्रकरणी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला सावदा पोलिसानी अटक केली असून सावदा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक विनोद खांडबहाले पुढील तपास करीत आहेत.



