रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागामार्फत अर्थसंकल्प- २०२३ वर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे बी अंजने यांनी भूषवले व आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुलांना बजेट वर अमूल्य असे मार्गदर्शन केले शेअर मार्केट विषयी माहिती सांगितली व अर्थसंकल्पाविषयी चर्चा केली. [ads id="ads1"]
त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. एच. पाटील यांनी केले मुलांना बजेट ची सुरुवात कशी झाली बजेट हा शब्द कुठून आला त्याचे महत्त्व किती व कुठे शब्दप्रयोग झाला त्याचबरोबर बजेट मांडताना कसे सादर केले जाते हे पटवून दिले व प्रास्ताविक प्रा. ज्ञानेश्वर कोळी यांनी केले व अर्थसंकल्पाचा अर्थ समजावून सांगितला. त्याचबरोबर कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. एम. के. सोनवणे लाभले त्यांनी मुलांना नेमकं बजेट म्हणजे काय असते त्याचं महत्त्व सांगितलं.[ads id="ads2"]
बजेट कशाप्रकारे सादर केलं जाते तर कर कसा वसूल केला जातो अशा बऱ्याच प्रकारे माहिती सांगितली व दुसरे वक्ते प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी बजेट पूर्वी नियोजन कसे करावे व बजेटला आपल्या व्यवहाराशी कसे जोडावे हे सांगितले व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ. नीता वाणी यांनी अर्थसंकल्प-२०२३ वर विद्यार्थ्यांशी चर्चा केली त्याचबरोबर कार्यक्रमाला प्रा. प्रदीप तायडे ,प्रा.व्ही. एन. रामटेक यांनीही आपली मते मांडली. बजेट चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व हजेरी लावली. कार्यक्रम अर्थशास्त्र विभागामार्फत घेण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थ्यांमधून गणेश पाटील ने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्राध्यापक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.