रावेर ग्रामीण प्रतिनिधि (दिनेश सैमिरे) त्यागमूर्ति माता रमाई आंबेडकर यांची जयंती विटवे तालुका रावेर येथे उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने सर्व प्रथम त्यागमूर्ति माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस जनक्रांती मोर्चा युवाजिल्हा अध्यक्ष आयु, साहेबराव वानखेड़े, पोलीस पाटील बाळु पवार, आयु, नरेंद्र वानखेड़े यांचे हस्ते धुप पूजा व पुष्पहार अर्पण करण्यात आले. [ads id="ads1"]
त्यानंतर बौद्धाचार्य करण मनुरे यांनी त्रिशरण पंचशील सामूहिक रित्या घेतले .यावेळी आयु, साहेबराव वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माता रमाई यांनी त्याग केला म्हणुन आज तुम्हा आम्हाला सुखाचे दिवस आले, माता रमाई यांच्या त्यागाची जाणीव ठेऊन डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याची जवाबदारी आपण सर्व समाज बाधवांची आहे. असे आवहन त्यांनी केले. [ads id="ads2"]
यावेळी सूत्रसंचलन नरेंन्द्र वानखेड़े यांनी केले तर आभार बाळु मनुरे यांनी केले यावेळी गावातील रविंद्र अढागळे, सुपडु वाघ, कुणाल अढागळे, मिथुन वानखेड़े, अंकुश मनुरे, सुशिल मनुरे, व गावातील तरुण, विद्यार्थी, विद्यार्थिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.