ऐनपूर महाविद्यालयाला युवारंग -२०२२ मध्ये इंस्टालेशन कला प्रकारात प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने युवारंग -२०२२ चे ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२३दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या युवा रंगांमध्ये महाविद्यालयातील १.अल्ताफ युसुफ पटेल याने वक्तृत्व,वादविवाद व इंस्टॉलेशन या तीन कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. २. ललित कडू पाटील याने वादविवाद व इंस्टॉलेशन या दोन कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. [ads id="ads1"]  

   ३. हर्षल विनोद पाटील याने चिकटकला या कला प्रकारांमध्ये सहभागी होता. ४. आशिष सुनिल कोळी याने रांगोळी आणि इंस्टॉलेशन या दोन कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता. ५. सृष्टी पाटील हिने पोस्टर मेकिंग व स्थळचित्र या दोन कलाप्रकारे मध्ये सहभाग घेतला होता.६ आयुष श्रीराम पाटील याने इंस्टॉलेशन या कलाप्रकारामध्ये सहभाग घेतला होता. अशा एकूण सहा विद्यार्थ्यांनी 11 कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.  [ads id="ads2"]  

  त्यापैकी इन्स्टॉलेशन या कला प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) महाविद्यालयाने पटकाविला या युवारंगा मध्ये संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. विनोद रामटेके व डॉ.जे.पी. नेहेते यांनी नेतृत्व व मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने व संस्थेचे अध्यक्ष भागवत पाटील,उपाध्यक्ष रामदास महाजन, चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी संजय पाटील, सर्व संचालक मंडळ, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी युवारंग मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे व संघ व्यवस्थापकाचे प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) मिळविल्या बद्दल अभिनंदन केले.

हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!