रावेर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी ; फाग लेंगी नृत्य ठरले मिरवणुकीचे आकर्षण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी ; फाग लेंगी नृत्य ठरले मिरवणुकीचे आकर्षण

रावेर ग्रामीण प्रतिनिधि (दिनेश सैमिरे) बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल यांची 284 वी जयंती निमित्त निमित्त बंजारा सेना व सेवा उत्सव समिती तर्फे भव्य शोभयात्रा व मिरवणूक रावेर शहरात संत सेवालाल महाराज यांचा सजीव देखावा घोड्यावर बसवून व प्रतिमा रथावर ठेऊन ढोल ताशा व पारंपरिक वाद्य च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. सादर मिरवणूक ही रावेर शहरातील पाराचा गणपती,दत्त मंदिर पासून मिरवणुकीची सुरुवात होवून शिस्त बध्द पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संत सेवालाल महाराज यांची विधिवत पूजा व पुष्प अर्पण करून जयंती साजरी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आली.[ads id="ads1"]  

लगी नृत्य आणि फाग ठरले मिरवणुकिचे आकर्षण

मिरवणुकीत बंजारा समाज बांधवांनी डी जे न लावता पारंपरिक वाद्य डफ,ढोल ताशा, च्या तालावर महिला पुरुष सर्वांनी पारंपरिक पोशाख परिधान करून फाग,व होळी गीतावर ठीक ठिकाणी घेर करून लेगि नृत्य करत रावेर शहरात एक आकर्षण ठरले. रावेर तालुक्यातील जूनोदा अभोडा,लालमाती,लोहरा, ताडजिंसी विश्राम जिनसी,पाल,गुलाबवाडी, के-हाळा, एनपुर, येथील बंजारा समाज बाधव मोठ्या सहभागी झाले.[ads id="ads2"]  

यांची होती उपस्थिती 

महेंद्र पवार,रघुनाथ चंदू चव्हाण धनसिंग पवार करणसिंग जाधव,छगन पांडू डॉ मधुकर पवार .बबन पवार, रमेश राठोड , विजय पवार,संजय राठोड, संजय राठोड,रामसिंग राठोड,सुनील राठोड प्रकाश चव्हाण, राहुल पवार प्रेमसिंग पवार अनिल पवार, विकास चव्हाण,किशोर चव्हाण,कुलदीप पवार,सुनील चव्हाण येनपुर व बंजारा समाजातील युवक, महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:- भरधाव ट्रकच्या चाकाखाली सापडून‎ चार वर्षीय  बालिका ठार : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

अ भा बंजारा सेना,व सेवा उत्सव समिती बंजारा कर्मचारी संघ यांनी कार्यक्रमा साठी परीश्रम घेतले सूत्रसंचालन सुनील पवार यांनी केले तर आभार सुरेश पवार यांनी मानले .पोलीस प्रशासनातर्फे पो. उ.नी.करोडपती,पो.उ.नी.विशाल सोनवणे पुरुषोत्तम पाटील यांच्यासह आदी सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!