रावेर ग्रामीण प्रतिनिधी(दिनेश सैमीरे) – रावेर तालुक्यातील ऐनपुर (Ainpur Taluka Raver) येथे सासरवाडीला जात असतांना खिर्डी बलवाडी रोडवर दत्त मंदिराच्यापुढे काही अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवीत दुचाकी स्वारास लुटण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला.[ads id="ads1"]
सविस्तर वृत्त असे की, भुसावळ(Bhusawal) येथील प्रवीण सोपान कोळी वय - ३८ हे रेल्वे कर्मचारी ड्युटी संपवून दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी ९.२५ वा.मिनिटाच्या MH १९.DP ८९०८ या पल्सर गाडीवर ऐनपुर (Ainpur Taluka Raver)येथे सासरवाडीला जात असताना खिर्डी-बलवाडी रोडवर दत्त मंदिराच्यापुढे असलेल्या एस कॉर्नर जवळ अज्ञात चोरट्यांनी चाकू व काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads2"]
त्यांच्या ताब्यातील पल्सर गाडीची चावी काढून मोटरसायकल पळविण्याचा प्रयत्न करत असताना सदर प्रकार लक्षात आल्याने त्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा मोटरसायकल चोरीचा प्रयत्न फसला.या घटनेची माहिती निंभोरा पोलिसांना (Nimbhora Police) मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेमध्ये वापरण्यात आलेले हत्यार, काठी जप्त करण्यात आले आहे.सदर या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.