आज दिनांक 9 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारी गोंधळावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.


📣 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान आजपासून कसोटी सामन्यांना सुरुवात होत असून, ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार आरोन फिंचने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.


📣 चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून नाना काटे उमेदवार असणार अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. 

  [ads id="ads1"]  

📣 शिक्षकांसाठी मोठी बातमी - राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षणसेवक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या मानधनात दुप्पटीने वाढ झाली आहे. 


📣 पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली, भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानी खेळाडू आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे. 

 

📣 छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये घडला आहे


📣 बँगलोर मध्ये इंडिया एनर्जी विक मध्ये इंडियन ऑईलं कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जॅकेट भेट दिल आणि हेच जॅकेट प्लास्टिक बॉटल पासून बनवण्यात आले आहे. 

 [ads id="ads2"]  

📣 सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनि निवडणूक आयोगाकडे केली. 


📣 अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर असणार - काल वेरुळ लेणीला दिली भेट, ध्यान साधनेतही सहभागी होणार आहे. 


▪️विरोधकांच्या ऐक्यावर मोदींची टीका: PM म्हणाले- निवडणूक निकालांमुळे जे एकत्र येऊ शकले नाहीत, त्यांना ED ने एकजूट केले


▪️खरगेंनी घेतली सभापतींची फिरकी, मोदीही हसले: खरगे म्हणाले- सभापती मशीनने नोटा मोजू लागले, धनखड हात जोडून म्हणाले- माझ्यावरही JPC लावाल?


▪️सर्वोच्च न्यायालय छावला बलात्कार प्रकरणाच्या निकालाचा आढावा घेणार: CJI सुनावणी घेणार; 3 आरोपींची निर्दोष मुक्तता


▪️'महाराष्ट्र भूषण' जाहीर: ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा


▪️आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला झाला नाही: औरंगाबाद पोलिसांचा दावा; गोंधळामध्ये माध्यम प्रतिनिधी किरकोळ जखमी


▪️उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी: सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी धनुष्यबाणावर निर्णय नको, पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेऊ द्या


▪️मनात खुर्ची होती म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या सभेतही फक्त खुर्च्याच: शुन्यात गेलो तरी 100 लोक निवडून आणू, आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर हल्लाबोल


▪️चंद्रकांत खैरे यांचा बोरनारेंना इशारा: लोकांना पैसे देऊन, दारू पाजून कार्यक्रमात सोडले; म्हणाले - बोरनारेंना मीच सरळ करणार


▪️संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत: नाना पटोलेंची टोलेबाजी; म्हणाले - बाळासाहेब थोरात यांनी त्यांना नेमले असेल, तर मला माहित नाही


▪️6 वर्षांनंतर भारतात कसोटी खेळणार ऑस्ट्रेलिया: नागपुरात आज गुरुवारपासून पहिला सामना, दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11 वरून चर्चांना उधाण


▪️सिनेमात हिरोची भूमिका आता साचेबद्ध: ते एकतर नायक किंवा एखाद्या घटनेचे बळी असतात; उलट महिला कलाकारांत वैविध - विद्या बालन

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!