रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील सावदा शहरामध्ये सायंकाळी 7. वाजता. वंचित बहुजन कामगार आघाडी चे जिल्हाध्यक्ष आयु. बालाजी पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला प्रमुख उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. विनोद भाऊ सोनवणे हे उपस्थित होते तसेच जिल्हा उपाध्यक्ष रफिक बॅग ,जिल्हा संघटक शेख याकूब शेख नसीर ,वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे, ता. सचिव अर्जुन वाघ ,रावेर शहर उपाध्यक्ष दौलत अढांगळे व पदाधिकारी उपस्थित होते. [ads id="ads1"]
जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे हे कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा असा एकमेव पक्ष आहे की या पक्षात तळागाळातील मोलमजुरी करणारा कामगार यांना न्याय कसा मिळेल आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष दिले जाते. आणि कामगारांच्या समस्या जाणून त्यांच्या न्याय मागण्यासाठी शासनापर्यंत पोहोचून न्याय दिला जातो असे ते म्हणाले. रावेर तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे हे म्हणाले की कामगार हा अजूनही कामगारच आहे त्याची प्रगती होत नाही त्यांच्याकडे आमदार असो किंवा खासदार असो हे लक्ष देत नाही कामगार त्यांना निवडून देतो परंतु शासन दरबारी लोकप्रतिनिधी त्या कामगारांची व्यथा मांडत नाही. [ads id="ads2"]
आणि शासनाच्या योजना आहे त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत किंवा कामगारांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून या देशातला कामगार हा कामगारच रहात असून तो त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण देऊ शकत नाही राहण्यास चांगले घर नाही रोजगार नाही नोकऱ्या नाही यामुळे कामगार हा गरीबच राहतो आणि आणि लोकप्रतिनिधी हे कोट्याधीश होतात. म्हणून कामगारांनी सुद्धा याकडे लक्ष दिले पाहिजे चांगल्या पक्षाच्या प्रतिनिधीला निवडून दिले पाहिजे जेणेकरून जो पक्ष या तळागाळातील वंचितांना न्याय देऊ शकतो त्याच पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिले पाहिजे. म्हणून या देशामध्ये बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश जी आंबेडकर हेच वंचित समाजाला न्याय देऊन सत्तेत बसू शकतात असे बाळू शिरतुरे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात बालाजी पठाडे साहेब म्हणाले की मा. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन कामगार आघाडीची स्थापना केली आहे . की या महाराष्ट्रात कामगारांना हक्काचे घर नाही रोजगार नाही बरेच कुटुंब आजही रस्त्यावर झोपत आहे या देशातील कामगार अजूनही रात्री उपाशीपोटी झोपत आहे. कामगारांच्या मुलांना शिक्षण नाही कारण या शासनाने जिल्हा परिषदेच्या संपूर्ण शाळा बंद केल्या आहे आणि खाजगी शाळांना प्राधान्य दिले आहे कारण या देशातल्या मनुवादी संस्कृतीला पुढे आणून इथला कामगार हा कामगारच राहिला पाहिजे हाच एक उद्देश या लोकांचा आहे . देशातला श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत आहे आज या देशाने गौतम अडाणी या व्यक्तीला कोटीने कर्ज दिले आहे परंतु एखादा सामान्य कुटुंबातील बेरोजगार कोणत्याही बँकेमध्ये गेला असता त्याला इथली बँक एक लाखाचे कर्ज सुद्धा देत नाही आणि या उद्योजकाला संपूर्ण बँकेतील पब्लिकचा पैसा दिला आहे आज आम्ही वंचित बहुजन कामगार आघाडी च्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व काय समस्या आहे ती नीट समजून घेण्यासाठी या ठिकाणी बैठकीचे आयोजन केलं आहे ज्या समस्या असतील त्या कामगारांच्या समस्या शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू व इथल्या कामगारांना न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. असे ते म्हणाले. या बैठकीला मोहसीन नसीर शहा, नूर मोहम्मद फिरोज शहा, शेख शरीफ, सलीम खान मोहम्मद खान, सय्यद शहीद जहांगीर, साहिल साहिल इनुस, खालिद खा, अरबाज रशीद शेख अहमद, रहमान महबूब तडवी, सलीम नवाब तडवी, शेख नजीर शेख हुसेन,सचिन प्रकाश बोदडे भूषण बी बुरान तडवी, फरीदाबी शेख मुसीर नौशाद इब्राहिम तडवी, रजिया बी शेख गफूर मालती दामू तायडे, मनीषा विलास लोखंडे बहुसंख्य महिला पुरुष कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.