यावल (सुरेश पाटील) यावल तालुक्यातील महसूल अधिकाऱ्याच्या मानसिक व आर्थिक छळाला कंटाळून अभिलेख शाखेचा अधिकृत शासकीय कर्मचारी गेल्या 6 महिन्यापासून बेपत्ता झाला आहे, त्यामुळे संबंधितांनी आपल्या सोयीनुसार कामे होण्यासाठी तसेच अर्थप्राप्तीसाठी त्या पदाचा कार्यभार अनधिकृतपणे शिपाई आणि कोतवालाकडे दिल्याने तसेच सन 1950 मधील पुरावे बोगस आदिवासींच्या पथ्यावर पडत असल्याने खऱ्या आदिवासी लाभार्थ्यांवर विपरीत परिणाम होत आहे या प्रकरणाची जिल्हाधिकारी जळगाव,फैजपूर प्रांताधिकारी यांनी चौकशी केल्यास यात एका तलाठ्यासह संबंधित अधिकाऱ्याचे मोठे रॅकेट उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे. [ads id="ads1"]
यावल महसूल मधील अभिलेख शाखा हा कक्ष इंग्रज काळापासून कार्यरत आहे या अभिलेख कक्षात 'मोळी' लिपी पासून अति महत्त्वाचे असे दस्तऐवज सांभाळून होते आणि आहे महत्त्वाचे पुरावे आणि यावल तहसीलचा एक 'आत्मा' म्हणून अभिलेख कक्षाची ओळख आहे.या अभिलेख कक्षातून सातबारा, 'ड' पत्रकाच्या व फेरपत्रकाच्या नोंदी जन्म-मृत्यूच्या नोंदी इत्यादी महत्त्वाचे दाखले, नकला काढल्या जातात महत्त्वाचे रजिस्टरच्या, कागदपत्राचे स्कॅन दोन-तीन वर्षांपूर्वी झाले आहे तरीसुद्धा काही संचिका नसताना सुद्धा आज ठराविक नागरिकांना पुरावे देताना अनधिकृतपणे कार्यवाही केली जात आहे. [ads id="ads2"]
आणि हे पुरावे देताना तालुक्यातील एका तलाठ्याचा आणि आणि एका महसूल अधिकाऱ्याचा मोठा प्रभाव पडत आहे आणि यातून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक प्राप्ती सुद्धा होत आहे,त्यामुळे बोगस लाभार्थ्यांना फायदा होत असून खऱ्या आदिवासी लाभार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.अशाप्रकारे दाखले जे देण्यात आले आहे त्याची जिल्हा स्तरावरून आणि प्रांताधिकारी यांच्या स्तरावरून एक समिती नेमून चौकशी झाल्यास यावल अभिलेख कक्षातील मोठा गैरप्रकार, भ्रष्टाचार जिल्ह्यातील महसूल विभागासमोर आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात राजकारणात, सामाजिक क्षेत्रात बोलले जात आहे.
अभिलेख कक्षातून चुकीचे आणि त्या तलाठी आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार आणि सोयीनुसार कामे न केल्याने अधिकृत असलेल्या कांबळे नामक रेकॉर्ड किपरवर मानसिक,आर्थिक दडपण आणून त्याला शिस्तभंग कारवाईचा धाक दाखविल्याने तो अधिकृत रेकॉर्ड किपर गेल्या सहा महिन्यापासून बेपत्ता झाला आहे,कार्यालयीन स्तरावरून त्याच्यावर लेखी पत्रव्यवहार केला असला तरी त्यांनी त्याच्या जीवाची काही बरे वाईट करून घेतले आहे किंवा काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने यावल अभिलेख कक्षाचे गेल्या तीन वर्षातील लेखा परीक्षण करून व चौकशी केल्यास मोठा गैरप्रकार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण महसूल क्षेत्रात बोलले जात आहे.