रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) उदळी बुद्रुक तालुका-रावेर जिल्हा- जळगाव येथे रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्या आयुष्यमती विमलबाई बाऱ्हे होत्या तसेच माजी पंचायत समिती सदस्या मायादेवी बा-हे,ग्रामपंचायत सदस्य आयु. हिरामण बाऱ्हे ,सौ. अश्विनी पवन बाऱ्हे, डॉ. शिरीष बाऱ्हे,आयु.पवन बाऱ्हे सर ,आयु.सुमित कृष्णा बाऱ्हे , पोलीस पाटील आयु.राकेश बा-हे, आयु.राजू बा-हे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. [ads id="ads1"]
कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून आयुष्यमान विनोद बाऱ्हे सर व आयुष्मान विजय बाऱ्हे सर उपस्थित होते. रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन व दीप प्रज्वलित करून त्रिशरण, पंचशीलग्रहण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. इयत्ता सहावी तील विद्यार्थी भावेश बाऱ्हे यांने रमाई यांचे जीवन कार्य बाबत माहिती सांगितली. [ads id="ads2"]
तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थी लिन्मय बाऱ्हे याने रमाई यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भिमाच रमाईच हे गीत गायन केले. प्रमुख वक्ते आयुष्मान विजय सर यांनी रमाई यांचा जीवन परिचय रमाईंच्या जीवनातले प्रसंग, स्वसुखत्यागी कारुण्याची मूर्ती माता रमाई कशा घडल्या हे विशद केले.
दुसरे प्रमुख वक्ते आयुष्मान विनोद सर यांनी रमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या समाज बांधवांनी नवतरुणांनी आपली प्रगती व विकास सर्वांच्या सहकार्याने, प्रयत्नांनी कसा साधता येईल.याविषयी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात आयुष्यमान विजय उत्तम बाऱ्हे यांचा राज्यस्तरीय 400 मीटर धावण्याचे शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विशेष सत्कार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतराज वाघ, अमोल बा-हे, गौरव बा-हे, राहुल बा-हे, सौरव बा-हे, राजवर्धनबा -हे, मयूर बा-हे, अखिल बा-हे, दिपक बा -हे, अतुल बा -हे संदीप हिवरे,हरीश मेढे,हितेश लोखंडे, उत्तम बा -हे,सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.