रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी (दिनेश सैमिरे)
संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने भुसावल पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये दिनांक ३ फेब्रुवारी 2023 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हा संपन्न झाला. [ads id="ads1"]
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण संत तुकाराम महाराज यांचे नवे वंशज गुरुवर्य ह भ प श्री अशोक महाराज मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी महाराजांनी सांगितले की पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणातून राष्ट्राची निर्मिती होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन केले.या फाउंडेशनच्या ६ वर्धापन दिनानिमित्त कृषी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, डॉक्टर साहित्यिक, आध्यात्मिक ,वारकरी, पत्रकार, यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 25 कार्यवीरांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. [ads id="ads2"]
याप्रसंगी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नवे वंशज अशोक महाराज मोरे, आमदार संजय सावकारे ,पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,सहाय्यक आयुक्त उदय पाटील, उत्तर विभाग सार्वजनिक बांधकाम अभियंता यशवंत कोरके, धरणगाव तहसीलदार निलेश कुमार देवरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रवक्ते रामदादा पवार, सुनील महाजन राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वस्तीग्रह कक्ष, दिनेश कदम राष्ट्रीय सचिव मराठा वस्तीग्रह कक्ष, प्रमोद महाजन राष्ट्रीय अध्यक्ष मराठा दत्त कक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघाचे रावेर तालुका अध्यक्ष विलास ताठे,माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ आदर्श गाव साकेगाव येथील उपसरपंच आनंद ठाकरे, संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनचे छबिलदास पाटील, हितेश टाकले, महेंद्र पाटील, किशोर शिंदे, संजय कदम, रवींद्र लेकुरवाडे, महाजन, सचिन पाटील हेमंत पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव यांनी केले तर आभार प्रशांतराज तायडे यांनी मानले.


