रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - येथे माता रमाई आंबेडकर यांची 125वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या जवळ उत्साहात साजरी करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.प्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. [ads id="ads1"]
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, बौद्धाचार्य राजेंद्र अटकाळे यांनी त्रिशरण पंचशील घेतले. यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस कामगार नेते दिलिप कांबळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर माजी नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक ऍड. योगेश गजरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे यांचे हस्ते पुष्पपूजा,धूपपूजा व दिपपूजा करण्यात आले. [ads id="ads2"]
कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, पुंडलिक कोंघे, समता मंचचे कार्याध्यक्ष उमेश गाढे,चांगो भालेराव, व्यंकट ससाणे,रघुनाथ कोंघे,ज्ञानेश्वर अटकाळे,ऍड. ठाकणे ,सहा. फौजदार राजेन्द्र करोडपती यांचे सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.