रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विविध प्रश्ना संदर्भात आर पि आय जिल्हाध्यक्ष राजुभाऊ सुर्यवंशी यांनी घेतली प्रांताधिकारी यांची भेट घेवून रावेर तालुक्यातील विवरा येथील अतिक्रमण कायम करून ड यादीनुसार जागा नावे लावून घरकुलाचा लाभ मिळावा, गाते येथील जागे संदर्भात खरेदी विक्री करणेस येणाऱ्या अडचणी प्रांत अधिकारी यांनी पत्र व्यवहार करून सोडवाव्यात,तसेच वाघोडा बू येथील अतिक्रमण कायम करून त्यांना मालकी हक्काचे घर मिळावे याकरिता फैजपूर प्रांत अधिकारी यांचेशी चर्चा करण्यात आली.[ads id="ads2"]
यावेळी रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे,सचिव कमलाकर गाढे,सावदा शहर प्रमुख नरेन तायडे,युवा तालुका अध्यक्ष धोनी तायडे,युवा तालुका उप अधक्ष विनोद मोरे ,तालुका उप अध्यक्ष समाधान गाढे,रेखाताई गाढे,उषा इंगळे,तसेच इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.