फिरोज तडवी ( प्रतिनिधी) - भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष नंदलाल साखला व राज्य सचिव दीपक भाऊ चोपडा यांच्या खानदेश दौरा दरम्यान यानिमित्ताने जळगाव जिल्ह्या बैठक स्वाध्याय भवन येथे घेण्यात आली
या बैठकीत जामनेर येथील धडाडीचे कार्यकर्ते सुमित मुनोत यांची जिल्हाध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली यासाठी राज्यकारणी सद्स्य विनय पारख यांनी सुचवलेले नाव राज्याध्यक्ष नंदूभाऊ साखला यांनी स्वीकृती दाखवत सुमित मुनोत यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य कार्यकारणी सदस्य प्रा चंद्रकांत डागा माजी जिल्हाध्यक्ष विनोद जैन,खानदेश विभागीय अध्यक्ष अशोक श्रीश्रीमाळ, उपाध्यक्ष लतीश जैन मुक्ताईनगरचे जेष्ठ सद्स्य रमणलालजी बागरेचा, जळगाव शहर अध्यक्ष उदय कर्नावट, सचिव भूषण बोरा ,कांतीलालजी जैन आदी भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.