सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- येथील शिवाजी चौक परिसरातील वंजार वाडीतील रहिवासी शिवसेना शहर सचिव, इलेक्ट्रिक दुकान चालक शरद गिरधर भारंबे हे आपल्या कुटुंबासह सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सव या कार्यक्रमासाठी कुटुंबासह दिनांक १५ रोजी गेले होते. [ads id="ads1"]
त्यांच्या पश्चात घरी कोणी नसल्याचा फायदा घेत कुण्या अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात अनाधिकृतपणे प्रवेश करून लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील वडिलो पारजीत असलेले १५ ग्रॅम सोन्याचे दागिने (दोन अंगड्या प्रत्येकी ५ ग्रॅम, कानातील डोरले ५ ग्रॅम) तसेच घरात असलेल्या देव्हाऱ्यातील लाकडी ड्राव्हर मध्ये मोबाईल घेण्यासाठी ठेवलेले २० हजार रुपये ठेवलेले होते, असा एकूण ६५ हजार कोण्या अज्ञात चोरट्याने लंपास करून घराच्या दरवाजाचे कुलूप रस्त्यावर फेकून दिले होते.[ads id="ads2"]
याबाबत त्यांच्या शेजारी असलेल्या त्याचा पुतण्या वामन भारंबे यांनी शरद भारंबे हे सिहोर येथून घरी परतीच्या वेळेत येत असताना त्यांना दूरध्वनीवरून ही घटनेची माहिती दिली या बाबत वृत्त कळताच शरद भारंबे त्वरित घरी परत आल्याने घडलेला प्रकार उघडकीस आल्याने त्यांनी सावदा पोलीस ठाणे धाव घेऊन त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार
तरी शहरात चोरीचे प्रमाणात अधीक वाढ होवू नये.म्हणून लवकरच कायद्याला न जुमानता सदर प्रकारे चोरीचे उद्देश सफल करून मोकाट चोरट्यांना पोलीसांनी बेड्या ठोकणे गरजेचे असून रात्री शहरात पोलीसांनी गस्त वाढवावी.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


