रावेर तालुका प्रतिनिधी -विनोद हरी कोळी
आज दिनांक 19 /2/ 2013 रोजी निंबोल तालुका रावेर येथील ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम निंबोल येथील उपसरपंच अशोक माधव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन केले. त्यानंतर प्रहार दिव्यांग संघटना रावेर तालुका अध्यक्ष विनोद हरी कोळी यांनी सुद्धा पुष्पहार घालून पूजा केली.[ads id="ads1"]
त्यानंतर थोडक्यात मनोगत व्यक्त करण्यात आले . संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी लक्षात घेता सर्वांनी शिवाजी महाराजांचे गुण घेतले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात असा एकच राजाला आपण सर्वांना लाभला की त्यांनी स्वतःच्या जीवाची आहुती देऊन स्वराज्य स्थापन केले आहे. अशा या महान राजाला ग्रामपंचायत निंबोल मध्ये शत शत नमन केले.[ads id="ads2"]
त्या ठिकाणी उपस्थित उपसरपंच अशोक पाटील ग्रामसेवक एम.डी.पाटील, संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी ईश्वर भिल्ल तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील,पोलीस पाटील योगेश पाटील,हिरालाल पाटील दिगंबर धनगर भगवान चिकटे आदींनी उपस्थिती दर्शवली.
हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार


