रावेर तालुक्यातील तासखेडा येथे अवैध माती उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यास महसूल विभागाचा कानाडोळा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

रावेर तालुक्यातील तासखेडा येथे लघुपाटबंधारे विभागाचा कालवा जात असून विटभट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबी मशिंनच्या साह्याने अवैध माती उत्खनन करण्यात आले आहे.तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अगदी खुलेआम मातीची उत्खनन व वाहतूक केली जात आहे.[ads id="ads1"]  

  मात्र,या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभागासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध माती उत्खनन सुरू आहे.परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.तसेच शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्यांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.[ads id="ads2"]  

   तसेच जेसीबी मालक शुभम विकास चौधरी यांच्या बाबत पत्रकार संरक्षण समिती रावेर तर्फे तहसीलदार सो.रावेर यांना २४-१-२३ रोजी लेखी निवेदन देण्यात आले असूनही आज पावेतो महसूल विभागामार्फत कोणत्याही प्रकारची कार्यवाही का?करण्यात आलेली नाही.याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात असून महसूल विभाग कारवाई करणार का याकडे तासखेडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!