सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
रावेर तालुक्यात असलेल्या सावदा - फैजपूर रस्त्यावर हॉटेल मनाली शेजारच्या व सावदा नागरपालिका हद्दीतील पुर्वपार पासून कोचुर येथून वाहून येणाऱ्या या नैसर्गिक नाल्यात नियमबाह्य व निकृष्ट दर्जाचे बांधकामद्वारे थेट नाल्याची रुंदी कमी करून त्याचे रूपांतर एका गावा बाहेरील असलेल्या गटारी प्रमाणे शेत जमीनीला बिनशेती करून प्लाटी विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून स्वत:च्या आर्थिक हित जपण्यासाठी केला जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.[ads id="ads1"]
सदरील नैसर्गिक नाला हा पुर्वपार पासून सरासरी २० फूट इतकी रुंदीचा असल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून,तरी या नाल्याची शासकीय स्तरावरून भविष्यात होणाऱ्या पर्जन्यमान पाण्याची स्थिती बाबत कोणताही अंदाज बांधिला जात नसतो, परंतु काही तथाकथित संबंधित विभागातील भ्रष्ट अधिकारी व भूखंडमाफिया यांचे आर्थिक हितसंबंधामुळे भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामी कोणतेही प्रकारचे देणे घेणे नाही.कारण की,या नाल्या शेजारच्या गट नं.१३५ या शेत जमीनचे भुखंड विक्रीसाठी सपाटीकरण केल्यामुळे गेल्या पावसाळ्यात शहराच्या चौफेरबाजू पर्जन्यमानाचा अंदाज कोणीही ठरवू शकत नाही त्यामुळे सावदा-फैजपुर रस्ता सह शहर व परिसरातील घरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्याचे पाणी साचले होते.[ads id="ads2"]
याबाबतचा अनुभव पालिका व प्रशासकीय यंत्रणेला असून सुद्धा सदर सदरील नैसर्गिक नाल्याची रुंदीकरण होते तरी कसे?तसेच आता या नैसर्गिक नाल्याचे रूपांतर एका गावा बाहेर असलेल्या गटारी सारखे होत असून,भविष्यात पुन्हा पर्जन्यमान कमी जास्त झाल्यामुळे अधिक बिकट परिस्थिती उद्भवू शकते.तरी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात विनाकारणचा त्रास सहन करावा लागेल.तसेच स्थानिक यंत्रणेला साचलेल्या पावसाळ्याचे पाण्याचा निपटारा करण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ येवू नये.तरी नियमबाह्य होणाऱ्या नैसर्गिक नाल्याचे निकृष्ट काम थांबवावे. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.