रावेरात अंजन वृक्षाचे लाकूड जप्त ; एकावर गुन्हा दाखल : वन विभागाचा छापा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरातील मदिना कॉलनीत वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या छाप्यात अंजन प्रजातीच्या वृक्षाचे लाकूड जप्त करण्यात आले. त्याची बाजार भावाने किंमत २३ हजार रुपये एवढी आहे. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. वन विभागाची ही सलग तिसरी कारवाई ठरली.[ads id="ads1"]  

रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रावेर शहरातील मदिनाकॉलनी, ईदगाह रोड येथील रहिवासी मोहम्मद सलीम अब्दुल हसन यांच्या मालकीच्या प्लॉट क्रमांक १६ घराच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. [ads id="ads2"]  

  तेथे अंजन वृक्षाच्या लाकडाचे नग अवैधरीत्या दडवल्याचे निदर्शनास आले. चौकशी अंती शेख फिरोज अजीज (वय ४८) रा. मन्यारवाडा,रावेर याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत २३ हजार रुपये किमतीचे एकूण २.६०० घ.मी.लाकूड जप्त करण्यात आले.

यावलचे उपवन संरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनात रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, सह वनपाल रवींद्र सोनवणे, अरविंद धोबी, अरुणा ढेपले, वनरक्षक रमेश भुतेकर, लेघा पावरा, राजू बंडल, कल्पना पाटील, आयशा पिंजारी, सविता वाघ, पोकों चैतन्य नारखेडे, विक्रम सिसोदे, वाहन चालक विनोद पाटील, सुनील पाटील आदींनी ही संयुक्त कारवाई केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!