रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर तालुक्यातील विवरे खुर्द (Vivare Khurd Tal-Raver) येथील शिवाजी प्रभाकर तेली (वय - ३७) या तरुणाने विवरे खुर्द येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दिनांक ५ फेब्रुवारी दुपारी घडली आहे. निंभोरा पोलिसांकडून (Nimbhora Police) मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी प्रभाकर तेली या युवकाने आपल्या राहत्या घरात रविवारी गळफास घेतला.[ads id="ads2"]
या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. या घटनेची माहिती तुळशीराम सुधाकर तेली यांनी Nimbhora पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून निंभोरा पोलिसात (Nimbhora Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा तपास निंभोरा पोलिस स्टेशन चे (Ninbhora Police Station) पोलिस उपनिरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण हे करीत आहे.
मयत शिवाजी तेली

