रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर साईबाबा मंदीर समितीला सुर्या फाऊंडेशनच्यावतीने यंदाचा नोबल पुरस्कार २०२२-२३ देवुन गौरविण्यात आले आहे. [ads id="ads1"]
सुर्या फाऊंडेशनच्यावतीने दि.३ फेब्रुवारी रोजी पाळधी येथील नोबल इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित कार्यक्रमात रावेर येथिल साईबाबा मंदीराच्या अद्वैत संत साईबाबा बहुउद्देशीय संस्थेला नोबल पुरस्काराने प्रसिद्ध सिनेअभिनेत्री माहेरची साडी फेम अलका कुबल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार साईबाबा मंदिर समिती अध्यक्ष चंद्रकांत विचवे, सचिव आशालता राणे,ज्येष्ठ संचालक पि.एन. महाजन, वाय. एस. महाजन, सुनील महाजन (लक्ष्मी गॅस एजेंसीचे व्यवस्थापक), एस.के.महाजन (वाहक रावेर आगार),राजेश महाजन (योगराज ऑफसेट, रावेर) यांनी स्विकारला. [ads id="ads2"]
यांची होती विशेष उपस्थिती
पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापौर जयश्री महाजन, पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी, शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, स्वामी समर्थ गृपचे अध्यक्ष मनोज पाटील, कॅन्सर तज्ञ डॉ.निलेश चांडक, समाजसेविका महानंदा पाटील, उद्योगपती शरदचंद्र कासट, उद्योगपती गोपाल कासट, पारोळा येथील डॉ.हर्षल माने, उद्योगपती समाधान पाटील, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मी कोळी,पाळधी बु.सरपंच अलका पाटील, उद्योगपती दिलीप पाटील, दिव्य मराठी युनिट हेड संजीव पाटील, माजी पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, मनसे अध्यक्ष ॲड.जमिल देशपांडे उपस्थीत होते.
साईबाबा मंदीर समितीने केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक व महिलां विषयक कार्याची दखल घेऊन त्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते नोबल पुरस्काराने गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना सुर्या फाऊंडेशन संचालिका अर्चना सुर्यवंशी ,प्रशांत सुर्यवंशी यांच्यावतीने करण्यात आले होते.


