यावल प्रतिनिधी (फिरोज तडवी )
शिक्षक श्री लुकमान तडवी हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील नायगांव येथील मूळ रहिवासी असून गेल्या 40 वर्षांपासून कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण या ठिकाणी वास्त्यास असून रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिक्षक या पदावर काम करत आहेत.ज्ञानदानाबरोबरच ते सामाजिक कार्यात तितकाच मोलाची कामगिरी बजावतात, ऑगनायझेशन फोर राइट्स ऑफ ट्रायबल रत्नागिरी या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी भरीव काम करून अनेक महत्वाच्या प्रश्नाना वाचा फोडली. [ads id="ads1"]
वेळ प्रसंगी कधी दिल्ली तर कधी मुंबई मंत्रालय पाठपुरावा करून सामाजिक प्रश्न सोडवून आपल्या कामाची चुनूक दाखवली. कार्याध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष या संघटनात्मक पदावर काम करताना मागासवर्गीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेवून त्यांना न्याय देण्याचे काम देखिल केलेले आहे. [ads id="ads1"]
कोरोना सारख्या महाभयंकर आणि जीवघेण्या काळात पोलिसा सोबत पोलिसमित्र बनून तर आरोग्य खात्याबरोबर आरोग्य मित्र आणि रेल्वेस्टेशनवर सुध्दा अविरतपणे आणि निडरपणे अहोरात्र लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली.
2021 मध्ये चिपळूण शहरात ढगफुटी होवून संपूर्ण चिपळूण पाण्याखाली गेले. अशावेळी सामाजिक सहकार्यातून गरजू लोकांना किराणा सामान, चटया, कपडे,चादरी विद्यार्थ्यांत साठी वह्या आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडवले होते. [ads id="ads2"]
त्याचबरोबर त्यांनी आईवडीलांचे छत्र हरपलेल्या दोन मुलींच्या दहावी पर्यँतच्या शिक्षणांचि व्यवस्था केलेलि आहे.
त्यांचे मूळ गाव यावल तालुक्यातील नायगाव हे असून गावातील आरोग्य, शिक्षण आणि रोजगार वाढावा तसेच गावातील महिला भगिनी तसेच शाळकरी मुलींना आरोग्य विषयक जनजागृती आणि स्वरक्षणाचे धडे मिळावेत म्हणून आदिवासी ग्रामविकास मंडळ नायगाव अशा मंडळाची स्थापना केली आहे.
आदिवासी तडवी समाजाला आपली संस्कृती जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून चोपडा रावेर यावल मधिल खेड्यापाड्यांत जावून जनजागृती चे काम सहकाऱ्यांच्या मदतीने केलेले आहे.
गावापासून कितीतरी लांब राहूनही गावाबद्दल प्रेम आणि आस्थे पोटीच या गावातील होत करू लोकांना एकत्र करून मंडळाची स्थापना 2021 ला केली ते मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
कोकणातील सर्व नोकरदारांना एकत्र करत आदिवासी तडवी समाजाचा कोकणविभागिय स्नेहसंमेलन दिमाखात साजरे करण्याची परंपर अखंडित पने सुरू आहे,
शिक्षक श्री. लुकमान तडवी हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे असे त्यांच्या सामाजिक, आणि शैक्षणिक कार्यातून दिसून येते. या त्यांच्या कार्याची दखल घेवून रजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेने त्यांना पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यप्रसंगी माजी मुख्यद्यपक हैदर तडवी, सौ शहानूर तडवी, सौ संदीप वाघ, यांच्यासह बहूसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ,