यावल ता.प्रतिनीधी (फिरोज तडवी)
यावल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली,ज्यामध्ये 151 नारळाचे शिवलिंग सह सजीव देखाव्याचाही समावेश करण्यात आला, ही शोभायात्रा ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रापासून काढण्यात आली. ज्यामध्ये अश्वारूढ भारत माता , कलशधारी 21 मातांचे पथक तसेच दोन ट्रॅक्टर मध्ये सजीव देखावा साकारण्यात आला होता. [ads id="ads1"]
यापैकी एका ट्रॅक्टर मध्ये राष्ट्रीय एकात्मता दर्शवणारा देखावा सादर करण्यात आला. ज्यामध्ये सांगण्यात आले होते की, ज्या ईश्वर वा खुदाने आपल्याला रचले, निर्माण केले त्याने शारीरिक रूपाने, रंगाने कोणताही भेदभाव आपल्यात केला नाही. संपूर्ण मानव सृष्टी ला एकाच प्रकारचा निर्सग दिला , एकच सूर्य, चंद्र दिला. जी प्रकृती हिंदू, मुस्लिमांना पाणी, हवा देते तीच प्रकृती शीख, इसाई किंवा बौद्धी लोकांना ही पाणी हवा देते.परंतु मानवाने जाती धर्माच्या सीमा उभ्या केल्या आहेत. ह्या थीम वर आधारीत 'सर्व आत्माओ के परम पिता परमात्मा' हा देखावा साकारण्यात आला होता. तर दुसऱ्या ट्रॅक्टर वर 'देवो के देव महादेव' या संकल्पनेवर आधारीत देखावा साकारण्यात आला होता. ज्यामध्ये राम, कृष्ण, शंकर, हनुमान, गणपती, शिवशक्ती स्वरूपाची वेशभूषा साकारलेल्या मुलांना बसवण्यात आले होते. या रॅली तील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे 151 नाराळापासून बनवण्यात आलेले शिवलिंग होय. [ads id="ads2"]
या शोभायात्रेच्या निमित्ताने व्यसनमुक्ती चा संदेश देणारे पथनाट्य ही सादर करण्यात आले. ज्याद्वारे व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ब्रह्माकुमारीच्या राजयोग मेडिटेशन चा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.
ह्या शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी राजश्री दीदी, ज्योती दीदी, अरूण पाटील, शशिकांत वारुळकर, पुष्पा नाले, संदीप यादव, संजय साळुंखे, सागर यादव, विश्वनाथ बारी, दिलीप पाटील, दत्तू महाजन, शारदा इंगळे, मीरा बारी, कल्पना पाटील, चेतन बारी, भावना बारी आदींचे सहकार्य लाभले.