घनकचरा व्यवस्थापनाचे वाजले बारा ; यावल नगरपालिकेच्या मनमानी कारभाराकडे प्रभारी मुख्याधिकाऱ्याचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल (सुरेश पाटील) नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाचे पूर्ण 90 टक्के बारा वाजले असून सर्व यंत्रणा विस्कळीत झालेली असल्याने घनकचरा संकलन करण्याचे काम अनियमित तसेच ओला व सुका कचरा वाहतुकीसाठी असणारे वाहने नादुरुस्त असून वाहनांवरील स्पीकर बंद असल्याने घनकचरा संकलन करणारे कोणते वाहन कोणत्या ठिकाणी अनियमित अशा वेळेवर येत असल्याने पर्यायी बऱ्याच नागरिकांच्या घरात दुर्गंधी युक्त घाण कचरा पडून राहत असल्याने आणि नगरपालिका प्रशासनाची ठेकेदाराशी दर महिन्याला टक्केवारी ठरलेली असल्याने ठेकेदाराला त्याचे पेमेंट मात्र वेळेवर दिले जात आहे याबाबत यावलकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]  

         यावल नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याध्याकारी नसल्याने तसेच प्रभारी पदभार चोपडा येथील मुख्याधिकारी निकम यांच्याकडे दिलेला असल्याने नगरपरिषदेचा कार्यालयीन कारभार मात्र नगरपालिकेतील संबंधित कर्मचारी (आवक- जावक टेबल वरील कर्मचारी व इतर दोन-तीन कर्मचारी वगळता ) हे आपल्या वेळेनुसार,सोयीनुसार कामे करण्याची पद्धत ठरलेल्यानुसार कार्यालयात अनियमितपणे उपस्थित राहून आर्थिक व्यवहाराशी संबंधित कामांनाच प्रथम प्राधान्य देत आहेत,नगरपालिकेत यावल शहरातील नागरिक आपल्या विविध कामासाठी हेलपाट्या मारीत आहे परंतु त्यांचे कामे होत नाहीत,आणि ठेकदार मात्र आपली कामे वेळेवर करून असल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2="]  

      नगरपरिषद कार्यालयातील काही जबाबदार कर्मचारी जळगावला गेले आहे, नाशिकला गेले आहे, कार्यालयीन कामकाजासाठी बाहेर आहे अशी अनेक कारणे यावल नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना सांगून यावलकरांची शुद्ध दिशाभूल करून सोयीनुसार आपली कामे करीत आहेत यात मात्र घनकचरा व्यवस्थापनाचा मूळ ठेकेदार पुणे येथून चारशे पन्नास किलोमीटर अंतरावरून यावल शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे काम करीत आहे 

हेही वाचा:- अखेर प्रतीक्षा संपली : PM Kisan सन्मान निधीचा १३ वा हप्ता तुमच्या खात्यात "या" तारखेला जमा होणार

हेही वाचा :- अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत ! येथून करता येणार अर्ज

यात घनकचरा वाहतूक करणारा स्थानिक मुकडम कर्मचारी हा मात्र त्याच्या सोयीनुसार अनियमित घनकचरा संकलन करीत असल्याने घनकचरा व्यवस्थापनावर मोठा विपरीत परिणाम झालेला आहे यांना वेळेवर बिले मिळतात कशी ? यावल नगरपालिकेचा कारभार कसा सुरू आहे याकडे मात्र प्रभारी मुख्याधिकारी निकम आणि प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्याकडील कामाचा वाढता व्याप लक्षात घेता त्यांचे यावल नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी आपले लक्ष केंद्रित करून जळगाव नगरपरिषद शाखेमार्फत यावल नगरपालिका भोंगळ कारभाराची आणि मनमानी कारभाराची चौकशी तात्काळ करावी अशी यावल शहरात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!