फैजपुर तालुका यावल (सलीम पिंजारी)
फैजपूर नपातर्फे २१ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी सो.श्रीयुत प्रशांत सरोदे यांचेमार्फत प्रतिनिधिक स्वरूपात दिव्यांग कल्याणकारी निधी शहराध्यक्ष नितीन महाजन व दिव्यांग सेनेचे पदाधिकारी यांना देण्यात आला.सदर निधी दिव्यांग बांधवाचे बँक खात्यात वर्ग करण्यात आला.यासाठी नपाचे दिव्यांग विभाग प्रकल्प अधिकारी प्रभाकर सपकाळे व लेखापाल निलेश दराडे,विद्या सरोदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पुढील वर्षी ज्या दिव्यांग बांधवाकडे आँनलाईन UDID 【दिव्यांग प्रमाणपत्र】असेल त्यानांच निधी दिला जाईल.तरी दिव्यांग बांधवांनी आँनलाईन प्रमाणपत्र काढुन घ्यावे असे आवाहन मुख्याधिकारी फैजपूर व दि.से.संघटनेतर्फे करण्यात येत आहे.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी नितीन महाजन अध्यक्ष, नानाभाऊ मोची भाजप दिव्यांग विकास आघाडी ता.अध्यक्ष, चेतन तळेले ता.सचिव, मुन्ना चौधरी ता.अध्यक्ष,धिरज दाणी कार्याध्यक्ष, लोणार सरोवरचे अयसान कुरेशी, संजय वानखेडे, कुणाल वाघुळदे, मा.नगरसेवक देवेंद्र साळी,ईरफान मेंबर,कलिम मण्यार व मो.दानिश, अबु बजाज व शहरातील दिव्यांग बांधव ऊपस्थित होते.आभार प्रदर्शन नितीन महाजन यांनी केले.