भाविकांनी घेतले मोठ्या संख्येने दर्शन व फराळाचा लाभ
यावल (सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील विरावली येथे आज शनिवार दि.18 रोजी महाशिवरात्री निमित्त विठ्ठल मंदीरात गावचे माजी सरपंच,शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि यावल तालुका शेतकरी सहकारी संघाचे संचालक तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील व सौ.गजश्री तुषार पाटील यांना सौ.पत्नीसह विरावली ग्रामस्थांकडून विठ्ठल रुक्मिणी माता व महादेवपूजा करण्याचा योग/लाभ प्राप्त झाला. [ads id="ads1"]
याप्रसंगी माधव तुकाराम निळे,राजू माधव पाटील,व भाऊ मोतीराम पाटील माधव, मोतीराम पाटील, शिवाजी माधव पाटील,राजेंद्र धोंडू सिंग पाटील,गोकुळ गुलाब पाटील,कैलास उखा पाटील, अरुण मोहन पाटील,महिला भजनी मंडळ भावना धोंडूसिंग पाटील,देवकाताई पाटील,सपना चंद्रकांत पाटील,विमलबाई दिलीप पाटील,सुभाबाई दिगंबर पाटील,गंगुबाई काशिनाथ पाटील,महिला मंडळ व समस्त विरावली ग्रामस्थ मोठ्या संख्येने विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शास्त्रोक्त पद्धतीने झालेल्या पूजा व आरती कार्यक्रमात उपस्थिती होती. [ads id="ads2"]
याच प्रमाणे यावल शहरात एसटी स्टँड आवारात श्री काळभैरव मंदिरात,व्यास मंदिराजवळील मोठ्या महादेव मंदिरात, (तारकेश्वर मंदिरात), माझं गल्लीतील विठ्ठल मंदिरात,गंगानगर मधील महादेव मंदिरासह ठीक ठिकाणच्या महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त पूजा आरती करून भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले.