सावदा येथून दीडशे भाविकांची जाळीचा देव येथे जाण्यासाठी पदयात्रा निघाली

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल (सुरेश पाटील)

श्री दत्त मंदिर संस्थान सावदा येथून जाळीचा देव स्थानावर जाण्यासाठी काल दि. 31 सकाळी पदयात्रा निघाली यात्रेत सुमारे दीडशे भाविक सहभागी झाले. [ads id="ads1"]  

         मंगळवार दि.३१ रोजी सकाळी श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीचे पूजन करून दर्शन घेऊन यात्रा प्रारंभ झाला ही यात्रा चांगदेव,हरताळा,बोदवड, बेटावद,सावळदबारा इत्यादी तीर्थक्षेत्रावरून जाळीचा देव येथे दि.४फेब्रुवारीला पोहोचेल ५ फेब्रुवारी चा यात्रा महोत्सव आटोपून तेथेच समारोप होईल या यात्रेसाठी परिसरातील रावेर तालुक्यातील सावदा,कोचुर, यावल तालुक्यातील मोहराळा, भुसावळ तालुक्यातील वरणगाव, कर्की, वेल्हाला येथील सदभक्त मंडळी सहभागी झाली आहेत. [ads id="ads2"]  

   श्रीमुर्तीचे पूजन अनिल महाजन व सौ.विद्या अनिल महाजन यांनी केले ही सर्व मंडळी जाळीचा देव येथे निघाली आहे यात्रेचे आयोजन आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री सावदा व महंत राजकुमार दादा वरणगाव यांनी केलेले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!