🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात
📣 केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, पंतप्रधान आवास योजनेत 2 कोटी घरांचा संकल्प होता मात्र आतापर्यंत 68 लाख घरे पूर्ण झाली तर बाकी उरलेली घरे लवकरच पूर्ण होणार
📣 महाराष्ट्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला.
[ads id="ads1"]
📣 सुरत येथील एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली 10 वर्षे जुन्या खटल्यावर काल सुनावणी झाली.
📣 गेल्या दोन दशकांच्या तुलनेत 2022 मध्ये सर्वाधिक आरोपींना फाशीची शिक्षा देशातील सत्र न्यायालयांनी वेगवेगळ्या खटल्यांत तब्बल 165 जणांना सुनावला मृत्यूदंड
📣 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची मोठी घोषणा विशाखापट्टणम ही राज्याची नवी राजधानी असणार आहे.
📣 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले आहे त्यानुसार 2023-24 साठी जीडीपी 6.5% राहण्याचा अंदाज आहे.
[ads id="ads2"]
📣 महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत, पक्ष प्रवेशाचे कारण सांगताना म्हणाले, कलाकारांच्या अडचणी मांडण्यासाठी, मदत-मार्गदर्शनासाठी घेतला प्रवेश
▪️ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश: नवीन नियम 2025 पासून लागू होणार, आमदार पडळकर म्हणाले- सरकार निर्णय घेणार
▪️ महाराष्ट्राला मिळाले राज्यगीत: 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा स्वीकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
▪️ बागेश्वर बाबांवर अजित पवार संतापले: महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्याविरोधात नव्या कायद्याची गरज; अधिवेशनात मागणी करणार
▪️ म्हाडाची शिवसेना नेत्याला क्लीन चीट: पाठवलेली नोटीस घेतली मागे; परब म्हणाले - पुराव्याच्या आधारे किरीट सोमय्यांना नाक घासायला लावू
▪️ इकोनॉमिक सर्व्हे संसदेत सादर: 2023-24 साठी GDP 6.5% राहण्याचा अंदाज, बेरोजगारी दर कमी होऊन 7.2 टक्क्यांवर
▪️ संसदेत राष्ट्रपतींचे अभिभाषण: मुर्मू म्हणाल्या- देशात न घाबरता निर्णय घेणारे सरकार; सर्जिकल स्ट्राइक, कलम 370 आणि तीन तलाकचाही उल्लेख
▪️ अदानी टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर: शेअर्स कोसळल्याने आठवड्यात नेटवर्थमध्ये 35.5 अब्ज डॉलर्सची घट, 84.4 अब्ज डॉलर्सवर घसरले
▪️ धनबादच्या आशीर्वाद टॉवरला आग, 14 जणांचा मृत्यू: दिवा पडल्याने अग्नितांडव, सिलिंडर फुटून 24 हून अधिक लोक जळाले
▪️ खेलो इंडिया युथ गेम्स: खो -खो मध्ये पुरुष, महिला संघाचा MP वर विजय, टेबल टेनिसमध्ये चौघे बाद फेरीत, बॉक्सिंगमध्ये देविका विजयी
▪️ पॉप गायक मायकल जॅक्सनवर येतोय चित्रपट: निर्मात्यांची घोषणा, मायकलचा पुतण्या जाफर जॅक्सन साकारणार मुख्य भूमिका
▪️ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लगीनघाई: हातावर रंगली सुमीतच्या नावाची मेंदी, होणाऱ्या नवऱ्यानेही हातावर काढली मेंदी