मानपुर ता. भुसावळ (प्रतिनिधी) आज दि. 10 फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी मानपूर ता. भुसावळ येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली असून त्या वेळी बांधकाम सुरु करण्याआधी मानपूर येथील अंगणवाडी सेविका पूजा गाढे यांच्या हस्ते नारळ फोडून त्या कामाचे पुजन करण्यात आले.[ads id="ads2"]
त्या वेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जळगांव जिल्हाउपाध्यक्ष प्रेमभाई तायडे, ग्रामपंचायत सरपंच विनोद पाटील, समाजिक कार्यकर्ते आकाश तायडे, बांधकामाचे ठेकेदार फरीद शहा, तसेच उमर शहा, जावेद शहा, व कामगार देविदास सपकाळे, लखन कोळी, गोविंदा कोळी, व इतर गावकरी उपस्थित होते.