फैजपूरच्या पावन भूमीवर बाविसाव्या युवा रंगाचे शानदार उद्घाटन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

फैजपुर प्रतिनिधी (सलीम पिंजारी)

उद्घाटन समारंभासाठी पाहुणे कलाकार म्हणून उपस्थित असलेले मराठी सिने सृष्टीचे नामवंत विनोदी अभिनेते ओमकार भोजने यांनी युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की युवकांसाठी अभिनय आणि कलासृष्टीत पदार्पण करत असताना संघर्ष करण्याची तयारी आणि त्यासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व पटवून दिले आणि कला विश्वात वावरत असताना आपले व्यक्तिगत जीवन हे समाजाची संपत्ती असते म्हणून नितीमुल्यांच्या माध्यमातून तिचे संरक्षण करणे ही एका कलाकाराची जबाबदारी आहे असे सांगत समोर उपस्थित कलाकारांना आवाहन केले की कलाक्षेत्रात युवरांगतील सर्व कलावंतांचे स्वागत आहे भविष्यात तुम्हीही माझ्यापेक्षा मोठे कलाकार व्हा अशी शुभेच्छा दिल्या.[ads id="ads1"]  

उद्घाटक कुलगुरू डॉ.व्ही एल माहेश्वरी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात युवक महोत्सव म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक जीवनाची सांगड घालणारा एक रंगीत महोत्सव या रंगीत महोत्सवाच्या माध्यमातून युवकांनी आपल्या प्रतिभांना कलागुणांना जगासमोर सादर करावे आणि एक यशस्वी कलाकार म्हणून समाजात नावलौकिक मिळवावे हे असे सांगितले तसेच आयोजनाविषयी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर आणि विद्यापीठातील समितीच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.[ads id="ads2"]  

 आमदार शिरीष चौधरी स्वागत अध्यक्ष सन्माननीय आमदार शिरषदादा मधुकरराव चौधरी अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर, यांनीही आपल्या भाषणात युवारंग म्हणजे केवळ रंगीत कलांचा उत्सव नसून याच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि सामाजिक घटनांचा परामर्श मांडला गेला पाहिजे या सोबतच ऐतिहासिक घटनांची जान करून देण्यासाठी फैजपूर येथे भरलेल्या 1936 च्या राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाची आठवण करून देत सर्व हुतात्म्यांच्या कार्याची आठवण या निमित्ताने करून दिली आणि छुपे रुस्तम हे गाणं सादर करून उपस्थित सर्व युवक प्रेक्षकांची मन जिंकली.


*विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर सुनील कुलकर्णी*

*प्रास्ताविक* डॉ. सुनील कुलकर्णी विद्यार्थी विकास अधिकारी कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांनी युवा रंगाची प्रस्तावना करत असताना सांगितले की तिन्ही जिल्ह्यातील लहान मोठ्या सर्वच महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोठा असा हा युवारंगा उत्सव आहे ज्याच्या माध्यमातून दरवर्षी कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळत असतो, समाजात त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असते म्हणूनच विद्यार्थी जीवनात युवकांसाठी लाखो रुपये खर्च करून विद्यापीठ अशा प्रकारचा कार्यक्रम राबवीत असते या कार्यक्रमाचा सर्व कलाकारांनी अतिशय आनंदाने,उत्साहाने आणि सामंजस्याने आस्वाद घ्यावा व आपल्या अंगी असलेल्या कलांचे प्रदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करत आपले भाषण संपवले.


*डॉ.संतोष चव्हाण*

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ.संतोष चव्हाण- सहसंचालक उच्च व तंत्र शिक्षण विभाग,जळगाव यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयीन जीवनात अशा प्रकारच्या महोत्सवांसाठी शासनातर्फे लागणारी योग्य ती मदत योग्य त्यावेळी करण्यात येईल असे आश्वासन देत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच कला विश्वात आणि इतर सामाजिक कामातही आपले वर्चस्व दाखवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


*प्राचार्य डॉ. पी.आर चौधरी*

प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी सुरुवातीला समोर उपस्थित युवा जनसमुदायाला आवाहन केले की युवारंग 2022 हा अत्यंत मोठा उत्सव आहे,जवळपास दोन हजार कलावंत आणि इतर मान्यवर या प्रांगणात पाच दिवस उपस्थित असणार आहेत म्हणून अपणा सर्वांना सेवा देण्याचे पुण्य कर्म आमच्या हातून घडविण्याच्या मान विद्यापीठाने आम्हाला दिल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले आणि महाविद्यालतीन प्रशासना ला शक्य असतील त्या सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू अशी ग्वाही देत सर्व कलाकारांनी ही आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

*प्रतिज्ञा वाचन*

कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी प्रतिज्ञा वाचन करून व्याद्यार्थ्याना शिस्त सांभाळण्याचे आव्हाहन केले

*सूत्रसंचालन*

कॅप्टन राजेंद्र राजपूत

डॉक्टर राजश्री नेमाडे

*आभार*

डॉ. एस व्ही जाधव समन्वयक युवारंग 2022

राष्ट्रगीताने उद्घाटन समारोहाचा समारोप केला.


*उपस्थीत मान्यवर*

*तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर संस्थेचे पदाधिकारी*

सन्मा.आमदार शिरीषदादा चौधरी, अध्यक्ष तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर

श्री. लीलाधर चौधरी

प्रा डॉ.एस.के.चौधरी

प्रा.एम. टी. फिरके

प्रा.एन. ए. भंगाळे

प्रा.के आर चौधरी

श्री. बापुदादा वघुळदे,

श्री.संजय चौधरी, 

डॉ.एस.एस.पाटील

डॉ.नितीन महाजन

श्री.रामा पाचपांडे

श्री.ओमकार शराफ 

श्री.मधुकर पाटील,

श्री.हरीश वासंदाणी 

युवा नेते धनंजय चौधरी 


*कबचौउमवि विद्यापीठ पदाधिकारी*

डॉ.व्ही.एल.महेश्वरी कुलगुरू कबचौउमवि,

डॉ.विनोद पाटील कुलसचिव कुलगुरू कबचौउमवि,

डॉ. आर.एन. पाटील, वित्त व लेखा अधिकारी,

युवारंग 2022 कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र नन्नवरे

डॉ.सुनील कुलकर्णी, विद्यार्थी विकास अधिकारी 

डॉ.सोमनाथ गोहिल,

*समिती सदस्य*

डॉ.अनिल पाटील,

श्री. नरेंद्र नारखेडे,

डॉ. शिवाजी पाटील 

डॉ.संदीप नेरकर

डॉ.पद्माकर पाटील

डॉ.सुनीता पालवे

श्रीमती.स्वप्नाली महाजन

श्रीमती.नेहा जोशी

श्री. अमोल पाटील

श्री.दिनेश झालटे

श्री.दीपक चव्हाण, 

*प्राचार्य*

प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी

प्राचार्य. व्हि.आर.पाटील,

प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, 

प्राचार्य. डॉ आर.आर. आत्तरदे 

प्राचार्य गौरी राणे, 

प्राचार्य. आर. बी.वाघुळदे,

प्राचार्य अरूनाताई चौधरी, 

प्राचार्य आर. एल. चौधरी

प्राचार्य, डॉ.दलाल , डॉ.अंजने

सर्व विद्या परिषद सदस्य व सिनेट सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!