आज दिनांक 10 फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक बातम्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

🎯 महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातील घडामोडी वाचा 2 मिनिटात

📣 भाजपसह महाआघाडीचे मोठे नेते आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.


📣 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार असून, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहे. 


📣 समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट रघुवीर हा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार, यामध्ये अभिनेते विक्रम गायकवाड समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारणार आहेत. 

 [ads id="ads1"]  

📣 येत्या २७ फेब्रुवारीपासून ते २५ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहणार आहे, तर ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता राज्याचा अर्थसंकल्प सारद केला जाईल.  

 

📣 Disney कंपनीला आर्थिक मंदीचा मोठा फटका बसल्यामुळे कंपनीने सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 


📣 मध्यप्रदेश मधील प्रमुख शहरांतील वाढत्या प्रदूषणाला तंदुरी भट्टी देखील कारणीभूत असल्याचे कारण देत मध्यप्रदेश सरकारने भोपाळ, इंदोर, जबलपूर, ग्वाल्हेर शहरांत तंदुरी रोटी वर बंदी आणली आहे.

 

📣 राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांसाठी १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे.


▪️घोषणाबाजीत PM मोदींचे 90 मिनिटे भाषण: म्हणाले- नेहरू महान होते, तर त्यांच्या कुटुंबातील कोणी त्यांचे आडनाव का लावत नाही

 [ads id="ads2"]  

▪️NSA अजित डोभाल- पुतीन यांची भेट: रशियन अध्यक्षांनी सामरिक भागीदारीवर केली चर्चा; अफगाण - दहशतवादावरही फोकस


▪️मल्लिकार्जुन खरगेंनी परिधान केला 56 हजारांचा मफलर: भाजपने ओढले ताशेरे, मोदींच्या जॅकेटशी तुलना, म्हणाले - स्वाद अपना अपना, संदेश अपना अपना


▪️भाजपचा लोकसभेच्या खासदारांना व्हीप जारी: 13 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचा आदेश, संसदेत विरोधक-सत्ताधारी आमनेसामने


▪️औरंगाबादमध्ये जागतिक वैद्यकीय विक्रम: इतिहासात प्रथमच भिन्न रक्तगटाच्या HIV संक्रमित व्यक्तीचे किडनी प्रत्यारोपण यशस्वी


▪️​​​​​​​वाढदिवशीही CMशिंदेंवर उद्धव ठाकरेंची सडकून टीका: म्हणाले- गुरु आणि वडील चोरणारे तयार झाले, त्यांना संस्कार चोरता येणार नाही


▪️अजित पवारांचे शिंदे, फडणवीसांना आवाहन: आदित्य ठाकरे, प्रज्ञा सातव यांच्या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शोधून काढा


▪️आमदार डॉ. प्रज्ञा सातवांची सुरक्षा वाढवली: 2 पोलिस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात; कसबे धावंडा प्रकरणात आरोपीची तुरुंगात रवानगी


▪️नाना पटोलेंमुळेच मविआ सरकार पडले: ठाकरे गटाचा खळबळजनक दावा, थोरातांसोबत वाद न वाढवण्याची अपेक्षाही केली व्यक्त


▪️​​​​​​​ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर गुंडाळला: जडेजाने 5 तर अश्विनने घेतल्या 3 विकेट, टीम इंडिया स्कोअर-77/1


▪️264 कोटींचा 'टीडीएस' घोटाळा: अभिनेत्री कृती वर्मा सीबीआयच्या रडारवर; गैरव्यवहाराच्या पैशातून मालमत्ता खरेदीचा आरोप


▪️विवेक अग्निहोत्रींवर भडकले प्रकाश राज: म्हणाले - 'द कश्मीर फाइल्स' निकृष्ट दर्जाचा चित्रपट, इंटरनॅशनल ज्युरी चित्रपटावर थुंकले


▪️श्रीदेवी यांचे आयुष्य आता पुस्तक रुपातून उलगडणार: बोनी कपूर यांची घोषणा, 'श्रीदेवी द लाइफ ऑफ अ लिजेंड' आहे पुस्तकाचे नाव

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!