ऐनपुर प्रतिनधी :- विजय एस अवसरमल
शासन सुस्त,आरोग्य अधिकारी मस्त, गर्भवती महिला त्रस्त कथा आणि व्यथा आदिवासी गर्भवती महिलेची
मौजे कुसुंबा खुर्द ता. रावेर येथील दि.१७ जानेवारी रोजी झालेल्या आदिवासी गरीब महिलेच्या प्रसुती व नवजात बाळाची काळजी घेतली नाही व रुग्णवाहिका तसेच उपचार उपलब्ध करू न शकणाऱ्या ता. वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निलबनाच्या कार्यवाही करता ग्रामपंचयत सदस्य प्रदिप सपकाळे यांनी दि.१फेब्रुवारी पासून दवाखान्याला टाळे ठोकून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र जि. प. प्रशासनाने यांची दखल न घेतल्याने काल दि.१फेब्रुवारी पासुन बेमुदत आंदोलन करण्यात आले होते. [ads id="ads1"]
त्या अनुषगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ देशमुख यांनी आज दि.२फेब्रुवारी रोजी सदर वैद्यकीय अधिकारी यांचा पदभार काढण्यात येईल असे आश्वासन आंदोलन कर्ते प्रदिप सपकाळे यांना दिले होते मात्र त्यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे आंदोलन कर्त्यानी सबंधित आरोग्य उपकेंद्र मधील कर्मचारी व अधिकारी यांना बाहेर काढून आरोग्य उपकेंद्राला टाळे ठोकले असून आरोग्य उपकेंद्राच्या बाहेर रात्रंदिवस बेमुदत आंदोलन सुरू आहे. [ads id="ads2"]
या आंदोलनादरम्यान प्रदिप सपकाळे यांचे सोबत ग्रा.प. सदस्य गफुर रुबाब तडवी माजी सरपंच आय्युब बाशिर तडवी, माजी ग्रा.प. सदस्य जम्मा हैतू तडवी, हमीद शावखा तडवी, मा. सदस्य डी. के. भालेराव, माजी सदस्य देविदास प्रल्हाद पाटील, पीडित गर्भवती महिलेचा पती मुस्तूफा कलिंदर तडवी व जेठ करीम कलींदर तडवी,शरद भालेराव, एकनाथ कावडकर, गोपाळ नामदेव पाटील, सुरेश बुधो भालेराव, मुकेश प्रकाश भालेराव, इमाम उखरडू तडवी , रफिक नजीर तडवी यांचा सहभाग आहे. एवढे करून सुध्दा जि. प. प्रशासनास जाग न आल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रदिप सपकाळे यांनी दिलेला आहे.



