शौचालयाच्या कामाची चौकशी होणार ? यावल तालुका संभ्रमात पडला...आमसभा न झाल्याचा विपरीत परिणाम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल(सुरेश पाटील) यावल पंचायत समिती समोर निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी शौचालयाच्या कामासह इतर विकास कामांची चौकशी होण्यासाठी दि.30जानेवारी पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते, 10 फेब्रुवारी 2023 पर्यंत तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन यावल पंचायत समिती मार्फत मिळाल्याने अशोक तायडे यांनी सुरू केलेले उपोषण दि.1 रोजी म्हणजे तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले असले तरी 10 दिवसात चौकशी होणार याबाबत तसेच यावल तालुक्यात पंचायत समितीत आमसभा न झाल्याने तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने विशेष करून ग्रामीण भागात नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. [ads id="ads1"]  

         यावल पंचायत समिती समोर निळे निशाण सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी दि. 30 जानेवारी 2023 पासून उपोषण सुरू केले होते यावल तालुक्यातील म्हैसवाडी, आडगाव,चिंचोली,कासारखेडा,गिरडगाव,निमगाव,सावखेडा, थोरगव्हाण,वड्री,परसाडे व डोंगरकठोरा या गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या शौचालयाची कामे मंजूर इस्टिमेट प्रमाणे कामे न झाल्याने तसेच निकृष्ट प्रतीची झाल्याने चौकशीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते दि.30जानेवारी पासून सुरू केलेले उपोषण दि.1 फेब्रुवारी रोजी मागे घेण्यात आले उपोषणार्थि अशोक तायडे, संघटनेचे पदाधिकारी विलास तायडे,सहाय्यक गट विकास अधिकारी किशोर सपकाळे आणि संबंधितांनी यांच्याशी चर्चा करून पंचायत समितीकडून वाढदिवसाच्या चौकशी केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. [ads id="ads2"]  

       यावल तालुक्यात ग्रामीण भागात विविध विकास कामांसह शौचालयाच्या कामांमध्ये मंजूर व इस्टिमेट प्रमाणे कामे न करता निकृष्ट प्रतीची कामे झाल्याच्या तक्रारी आहेत.यात संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष का केले हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असून चौकशीचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे झाले असले तरी प्रत्यक्षात चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे आता तालुक्याचे लक्ष वेधून आहे. तालुक्यात ग्रामीण भागातील विविध समस्यांबाबत आणि विविध विकास योजना संदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्याशी चर्चा करणेबाबत जाहीरपणे आमसभा न झाल्याने त्याचा विपरीत परिणाम तालुक्यातील विकास कामांच्या गुणवत्तेवर झालेला दिसून येत आहे.

        तालुक्यातून बऱ्हाणपूर- अंकलेश्वर असा पूर्व-पश्चिम हा महामार्ग गेला आहे.आणि या महामार्गा प्रमाणेच पूर्व-पश्चिम रावेर आणि चोपडा विधानसभा मतदारसंघाचे दोन आमदार असताना महामार्गाची, राज्यमार्गाची तसेच यावल भुसावळ रस्त्याची यावल शहरा जवळ आणि ठिकठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे. निमगाव जवळ सुरू असलेल्या पूलाच्या बांधकामा जवळ पर्यायी रस्ता व्यवस्थित न केल्याने त्या ठिकाणी रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे,कामाच्या ठिकाणी कामाच्या माहितीचा फलक लावलेला नाही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे, अट्रावल गावाजवळ पुलाचे बांधकाम बंद पडले असल्याने अट्रावल मुंजोबा यात्रेत येणाऱ्या लाखो भाविकांसह अट्रावल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे जिल्हा परिषद जळगाव,सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव,पंचायत समिती यावल यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे किंवा नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामुळे यावल पंचायत समितीकडून चौकशी होणारच याबाबत तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे.

--------------------------------------

20 ते 25 पेट्या खर्च करुन नागरिकांची आर्थिक लूट करून 3 खोक्याची कमाई...?

लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे.

यावल तालुक्याचे पूर्व (रावेर), पश्चिम (चोपडा) असे 2 स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ आहेत रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरषदादा चौधरी तर चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आमदार सौ.लताताई सोनवणे आहेत या दोघांच्या मतदारसंघात आणि कार्यक्षेत्रात जिल्हास्तरीय आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,सार्वजनिक बांधकाम विभाग,हतनूर पाटबंधारे विभाग,प्रांताधिकारी, तहसीलदार,गटविकास अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, यावल पूर्व आणि पश्चिम वन विभाग अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेमध्ये काही ठराविक अधिकाऱ्यांना योग्य त्या कार्यालयात 3 वर्ष कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी 20 ते 25 पेट्यांची उलाढाल मुंबईपासून तालुकास्तरा पर्यंत करावी लागते.एकदाची बदली झाल्यानंतर तो एखादा अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकाराचा उपयोग करून संबंधित नागरिकांची कामे करताना काही नागरिकांकडून आर्थिक उलाढाल करून अंदाजे 3 ते 4 खोक्याची कमाई 3 वर्षात करीत असतो,म्हणजे 20 ते 25 पेट्या खर्च आणि 3 ते 4 खोक्याची कमाई ही लोकप्रतिनिधीची दिशाभूल करून नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप यावल तालुक्यातून होत आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारांची आर्थिक फसवणूक व पिळवणूक होऊ नये म्हणून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.असे यावल रावेर तालुक्यात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!