रावेर तालुका प्रतिनिधी- विनोद हरी कोळी
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील दारू,सट्टा,पत्ता, मोठ्या जोरात सुरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे खूप जोरात चालू आहे प्रशासन मात्र काना डोळा करत असल्याचे दिसून येत आहे. निंभोरा पोलीस हद्दीतील अनेक लोकांचे घरे उध्वस्त होत असताना इकडे शासकीय महसूल विभाग मात्र आपली तिजोरी भरत आहेत.[ads id="ads2"]
दिवसेंदिवस लोक व्यसनाधीन होत आहेत त्यात पोलीस प्रशासन अवैद्य धंद्यांवर दुर्लक्ष करीत आहेत. याला जबाबदार कोण ? असा सवाल संतप्त नागरिकांकडून होत आहेत. दारू,सट्टा,पत्ता या तिघीही अवैद्य धंद्यांवर पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे. असे संतप्त नागरिकांकडून मागणी होत आहेत.


